स्वप्न



आज वाटते उडावे आकाशात
धुंद होऊन फिरावे नभात
स्वप्नांना त्या मोकळे करावे
भेदुन सारे आकाश||

ओंजळीतील त्या फुलाप्रमाणे
उधळुन द्यावे सर्व आसमंतात
मग त्या फुलातील चांदण्याप्रमाणे
वेचावे स्वप्न आकाशात||

उंच उंच ढगात उडावे
इंद्रधनुष्य जवळून पहावे
हळुच मग खाली पहावे
सगळ्यांसाठी  परतुन यावे||

स्नेहा विरगांवकर


2 comments:

  1. शेवटी माणसाचे पाय जमिनीवरच. पण या स्वप्नांची हि मजा असते आपल्याला कितीतरी वेगळी दुनिया स्वप्नातून अनुभवता येते हे खरे .कविता छानच झाली आहे.

    ReplyDelete