रसग्रहण


Thou hast made me endless, such is thy pleasure.
This frail vessel thou emptiest again and again,
and fillest it ever with fresh life.

This little flute of a reed thou hast carried over hills and dales,
and hast breathed through it melodies eternally new.

At the immortal touch of thy hands my little heart loses its limits in joy and gives birth to utterance ineffable.

Thy infinite gifts come to me only on these very small hands of mine. Ages pass, and still thou pourest, and still there is room to fill.

भारताला पहिल्यांदाच साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून देणार्‍या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ही कविता. टागोरांनी स्वत:ला नेहमीच कवी म्हणवून घेतले असले तरी ते एक महान साहित्यिकही होते. 
रवींद्रनाथ उत्तम कवी, गीतकार, कादंबरीकार, कथाकार, संगीतकार, नाटककार, चित्रकार, नट, निबंध लेखक आणि समीक्षक होते. त्यांच्या काव्याप्रमाणेच त्यांच्या कथा हे बंगाली साहित्याचेच नव्हे, तर भारतीय साहित्याचे अमूल्य धन आहे. १९१३ साली गीतांजली ह्या त्यांच्या काव्यसंग्रहाला आशियातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. मूळ काव्यसंग्रह बंगालीमध्ये आहे.बंगाली भाषा अवगत नसल्यामुळे काव्याचा रसस्वाद घेणे अशक्यच होते, पण रवींद्रनाथांनी स्वत:च गीतांजलीचा बंगालीतून इंग्रजीत केलेला पद्य अनुवाद वाचण्यात आला.

हा अनुवाद वाचला आणि लक्षात आले की खूप खोल अर्थ आहे. चारच ओळी आहेत, पण परमेश्वराबद्दल वाटणारी कृतज्ञता ठासून भरलेली आहे. एखादा अभंग असावा असेच वाटले. असे शब्द अनुभूतीशिवाय नक्कीच येणार नाहीत. हे फक्त शब्द नाहीत, साधकाचे परमेश्वरावरचे अतीव प्रेम आणि परमेश्वराच्या भेटीची अनिवार्य ओढ प्रतीत होत आहे.

खरतर गुरुदेवांच्या आयुष्यात वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा ह्या जवळच्या माणसांचे मृत्यू पाठोपाठ झाले, पण त्या जगन्नियंत्याबद्दल त्यांच्या मनात कुठेही कटुता नाही. उलट जे आयुष्य मिळाले आहे त्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता आहे. चित्तात उदात्त भाव आहे.

Thou hast made me endless, such is thy pleasure.
This frail vessel thou emptiest again and again,And fillest it ever with fresh life.

मी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला क्षुद्र जीव आहे, पण तुझ्या दिव्य स्पर्शाने तू मला तुझ्यासारखा अनंत करतोस. माझ्या क्षणभंगुर आणि जीर्ण शरीरामध्ये तू परत परत हर्ष आणि नवचैतन्य भरतोस.माझे शरीर नवनवीन जन्म घेत असले तरी आत्मा अमर आहे. तू अनंत आहेस, तसेच तू माझ्यामध्ये वेळोवेळी प्राण घालून मलाही अनंत करतोस.
तू सतत माझ्याबरोबर असतोस. मला नवजीवन देतोस. माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या समवेत असतोस. मला आशा देतोस. माझ्या
अस्तित्वाच्या प्रत्येक कणासाठी मी तुझा आभारी आहे.

This little flute of a reed thou hast carried over hills and dales,
And hast breathed through it melodies eternally new.


स्वतःला एक मोकळ्या बांबूची उपमा देतात, ज्यात काहीही नाही. तू तुझ्या हातात घेऊन त्यात चैतन्य-श्वास भरतोस आणि त्यातून मधुर स्वर येतात. बांबूची बासरी होते.  तुझ्या फक्त स्पर्शाने मोकळ्या बांबूची मधुर बा
री होते. तसेच माझ्या जड शरीरास तू चैतन्य देऊन मला सजीव करतोस. पण असे मोकळे होणे, स्वतःचे काही नसणे, अहंकार नसणे हे किती कठीण असते. गुरुदेव ठाम विश्वास देतात, अहंपणा सोडल्याशिवाय परमेश्वर जवळ घेणार नाही. परमेश्वराच्या भेटीमध्ये अहंकार हाच अडसर असतो.

At the immortal touch of thy hands my little heart loses its limits in joy and gives birth to utterance ineffable.

परमेश्वराची कृपा पाहून हृदय उचंबळून येतेय. जीवनातल्या सगळ्या
गोष्टी त्याच्याच कृपेमुळे झाल्या हे आठवून अवर्णनीय आनंद होतोय.

Thy infinite gifts come to me only on these very small hands of mine.
Ages pass, and still thou pourest,
And still there is room to fill.

तू अनवरत कृपेच्या अमृतधारांचा वर्षाव करतो आहेस पण आम्ही मात्र त्यात भिजत नाही. आम्ही कोरडेच आहोत. तुझ्या करुणेचा घन सतत वर्षाव करतोय पण माझी छोटी ओंजळ मात्र अजून रिकामीच आहे.
देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. दाता समर्थ आहे पण माझीच झोळी दुबळी आहे. ह्या सुंदर जीवनासाठी परमेश्वराचे आभार मानतात आणि कृपा सदैव राहू दे अशी विनंती करतात.




मला कळलेला/ भावलेला अर्थ - भावानुवाद

तू अक्षय-अनंत-अपार, दिव्यत्व तुझे मज स्पर्शी
अन तू तुझ्यासवे मज अनंत अविनाशी करशी

ह्या क्षुद्र जीर्ण शरीरात तू
, पुनःपुन्हा नवचैतन्य भरशी
ह्या निष्प्राण वेणूम
धुनी, तू अवीट मधुर गीत आळवीशी

तुझ्या दिव्य मृदुलकरांनी
, सुखदुःखात उचलून घेशी
मम पदरात ओतशी
अवर्णनीय आनंदाच्या राशी

अनवरत अमृतधारा, अव्याहत कृपेने ओंजळ माझी भरशी
श्यामघन बर
सतोय,तरीही ओंजळ माझी रिक्त राहिली कशी

सौ. मंजिरी विवेक सबनीस

१५ |०४ | २०१९




2 comments: