सूर्य देई तेज जगाला
त्याहून तेजोमय कोण असे
तोचि असे आत्माराम
तुझ्या माझ्या मनी वसे
फुलं-पानं, वृक्ष-वेली
रेखाटले चित्र जणू
दुष्टास संहराया
धरिला नर-तनू
सगुण सुंदर रूप त्याचे
भावले माझ्या मनाला
भजन पूजन स्मरण त्याचे
नेई मज निर्गुणाला
निर्गुण निराकार जाणिले त्याला
अंतरी प्रगटला भाव नवा
सोहम् मनी जागविला
एक झाला जिवा शिवा
सगुण गेला,निर्गुण ही गेला
मनी लाभला विश्राम
एकरूपी,एकचित्ती जो राहिला
तोचि असे आत्माराम…
छानच कविता
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteदुसऱ्या कडव्या मध्ये नंतर खालील बदल केला होता
ReplyDeleteफुलं-पानं, वृक्ष-वेली,
रेखाटले चित्र जणू.....
गुणमयी ती प्रकृती,
त्याची सावली जणू.....