अलका तू तर वर्मा वरती
बोट ठेवले असे नेमके
घरे सर्वांची मनामधे गं
बोलत असती हेच सखे
चूक सनातन निस्तरण्याची
वेळ आता हीच म्हणा
टी व्ही समोरील ध्रुवबाळाला
घर कामाची गोडी लावा
सोपी सोपी कामे आणिक
थोडी थोडी कठीणशी
मुलांनाही सहज म्हणावे
करा पटापट हातासरशी
पांढऱ्यावर काळे काही
करत रहा तू अधेमधे
कामातून मग विश्रांतीही
तूज मिळे गं सहज इथे
रुपा भदे
Nice poem Rupa. Hopefully there are some positive things we can see in near future due to lock down.
ReplyDelete