विठु माऊलीवरील श्रद्धा आणि माणुसकीचे दर्शन



माझी मैत्रीण शालूने परवा फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती की... जातीचा गर्व करू नये. काळ आणि वेळ आल्यावर जात कामाला येत नाही तर माणुसकीच कामाला येते.
आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आला तो तुमच्याशी शेअर करावा वाटला म्हणून हा लेखनप्रपंच.

ऱ्याच वर्षांपासून च्छा होती वारीचा सोहळा अनुभवावा. त्या प्रमाणे प्लॅन करून माझ्या बहिणीकडे गेले तिच्या घरापासून आळंदी 5 कि.मी. दूर. एक मैत्रीण सोबत होती. मग काय तिघी जणी चालत आळंदीला गेलो.

दुसरे दिवशी वारीत सामील झालो. सोहळ्याचा आनंद घेत जयहरी माऊलीच्या गजरात  दोन दिवस चाललो. खूप छान वाटले. वारकऱ्यांचा उत्साह बघून, तहान-भूक विसरून जगरहाटी विसरून विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने त्याची पावले पुढे पुढे जात होती. असा दोन दिवस आनंद लुटला.
दुसरे दिवशी बंगलोरला परत येण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आले. एस्कलेटरवरुन  अचानक कसा माझा पाय घसरला कळलेच नाही. मी खाली घरंगळत आले तोपर्यंत कोणीतरी एस्कलेटरचे बटण बंद केले. मी खाली पडले, सामान एका बाजूला पडले.
कोणीतरी मला उचलून बाजूला बसवले. पाणी दिले प्यायला. माझा हात एवढा दुखत होता की तो उचलताही येत नव्हता काय करावे सुचेना. हताश होऊन बसले.

तेवढ्यात एक रिक्षावाला आला कुठे जायचे विचारत होता. लोकांनी माझी कंडीशन सांगितली.  तेवढ्यायात माझ्या मुलाचा फोन आला... त्या दोघांचे  बोलणे झाले. मुलगा म्हणाला, दादा आईला जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करता का? तोपर्यंत माझे मावशीकाका येतील. तो म्हणाला, भाऊ काळजी करू नकोस. तुझी आई ती माझी आई. मी करतो.  
तो म्हणाला जहांगीरमध्ये गेले तर आधी 10-15 हजार रुपये मागतात.  माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे नेतो आणि त्याने माझ्या सामानासह उचलून रिक्षात बसवून डॉक्टरकडे घेऊन गेला. तर डॉक्टर  नव्ह्ते. दोन तासांनी आले, तोपर्यंत तो थांबला. हीण आणि भाउजी आले. ते म्हणाले, भाऊ आम्ही आलो. तुम्ही जा. तुमचा धंदा बुडतोय. तर म्हणाला, आईपेक्षा धंदा महत्त्वाचा नाही.मग त्याने एक्सरे काढायला नेले. तिथेही बार्गेनिंग करून एक्सरे काढून घेतला परत डॉक्टरला दाखवून घरी घेऊन आला. 
असा तो पाच तास माझ्या सोबत होता आपलं कामधाम सोडून. तर याला असेच म्हणावे लागेल न काळ वेळ आल्यावर जात कामाला येत नाही तर माणुसकीच कामाला येते आणि विठुमाऊलीवरील श्रद्धा!!
माऊलीच रिक्षावाल्याच्या रूपाने धाऊन आली. हाताला दोनतीन ठिकाणी फ्रॅकचर झाले, सर्जरी झाली. आता ठीक आहे. माऊलींच्या कृपेने व्यवस्थित आहे. माझी माऊलीवरील श्रद्धा आणखी दृढ झाली.

जय हरी ‌ विठ्ठल जय माऊली!
रत्ना भोरे 



5 comments:

  1. खूप छान. देवाचे अस्तित्वा ची जाणीव होते.

    ReplyDelete
  2. अस्तित्व हे खरंच निर्गुण निराकार आहे..
    जयहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल...

    ReplyDelete
  3. जयहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल...
    नक्कीच अस्तित्व नाकारता येत नाही.

    ReplyDelete
  4. खरंय माणुसकीला पर्याय नाही! आणि ही माणुसकी अनुभवणे आपल्या नशिबात असावे लागते!! नशीबवन आहात तुम्ही...... वर्षाली

    ReplyDelete
  5. खर आहे माऊ...माणसातल्या देवावर विश्वास ठेवला कि देव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात दर्शन देतोच....रूजुता

    ReplyDelete