किस्से कहाण्या दुसऱ्या महायुद्धाच्या - २ ऑपेरेशन मार्केट गार्डन : एक फसलेली मोहीम


पार्श्वभूमी :

पॅरिसची मुक्तता केल्यानंतर मित्रराष्ट्रांची घोडदौड जर्मनीच्या दिशेनी सुरु झालीउत्तर सागर पासून स्वित्झरलँडच्या सीमेपर्यंत ह्या आक्रमणाची व्याप्ती होतीजर्मनीचा प्रतिकार झपाट्याने कोसळू लागला होता. तोकडा रसद पुरवठा हे एकच अडचणीचे कारण होते. नेदरलँड आणि जर्मनीच्या सीमेवरील ऱ्हाईन नदी हा शेवटचा नैसर्गिक अडथळा होता. त्या वेळेस दोस्तांचे सैन्य बेल्जियम आणि हॉलंडच्या सीमेवर होते.

छत्रीधारी सैन्य सगळ्यात विशेष सैन्यापैकी एक समजले जाते. त्यातील सैनिकांची युद्धक्षमता फार वरच्या श्रेणीची असते. जेव्हा अशा सैन्याच्या मोहिमा एका नंतर एक थांबविल्या जातात तेव्हां त्याचा फार विपरीत परिणाम सैनिकांच्या मनोधैर्यावर होतो. सदर वेळेस एकट्या १ ऐरबोर्न डिव्हिजनच्या १६ मोहिमा ऐन वेळेस रद्द झाल्या होत्या.

Battle plan
योजना :

दोस्त सैन्याच्या सेनापतीफील्ड मार्शल मोंटगोमेरीनी ह्या मोहिमेची आखणी केली होती. त्यांच्या योजने प्रमाणे तीन छत्रीधारी डिव्हिजन्स सध्याच्या युध्यरेषेपासून ऱ्हाईन नदीपर्यंतचा ५६ मैलाचा मार्गवाटेतील सर्व पुलांसकट काबीज करतील. योजनेच्या गार्डेन भागानुसारदोन दिवसांच्या आंत सैन्याच्या तिसाव्या कोरचे सैनिक त्यांना मोकळे करतील आणि पुढे जर्मनीत प्रवेश करतील. उत्तर हॉलंडमधून लंडनवर अग्निबाणांचा मारा करणारी ठिकाणेसुद्धा नष्ट केली जातील. वरील हल्ल्यासाठी अमेरिकन १०१ आणि ८२ airborne आणि १ ब्रिटिश airborne अश्या तीन डिव्हिजनच्या ३०००० सैनिकांची व त्याना इष्टस्थळी पोहचवण्यासाठी ५००० विमानांची आणि २५०० glidersची व्यवस्था केली गेली होती. (तुलनात्मक रित्या १९७१ मध्ये आपण ढाक्याजवळ एक ब्रिगेड म्हणजे ३००० सैनिक उतरवले होते.)

ही योजना साकार होण्यात सगळ्यात मोठी अडचण वाटेतल्या नद्यां व कालव्यांवरील पुलांना एकसंध स्थितित काबीज करण्याची होती. असे एकूण ५ पूल होते. त्यातील सर्वांत शेवटचा व म्हणून सर्वात महत्वाचा पूल, ऱ्हाईन नदीवर अर्न्हेम येथे होता. नदीकाठची जमीन दलदलीची असल्यामुळे छत्रीधारी सैनिकांना उतरविण्यासाठी आणि वाहनांना वापरण्यासाठी अयोग्य होती व त्यांना लांबून चढाई करण्या पासून पर्याय नव्हता. त्यांतून दोन गोष्टींची माहिती योजना आखण्याऱ्यांना नव्हती. एक म्हणजे जर्मनीचे एक डिव्हिजन माघार घेत आईंडहोवेन परिसरात आले होते आणि रणगाड्याच्या दोन डिव्हिजन अर्न्हेम जवळ ठेवलेल्या होत्या.
John Frost Bridge Arnhem
मोहीम :

दिनांक १८ सप्टेंबर १९४४रोजी १०१ अमेरिकन airboarne ला आईंडहोवेन (जग प्रसिद्ध फिलिप्स कंपनीचे माहेरघर ) परिसरात,
८२ अमेरिकन airboarneला Nijmegan ( जेथे कधीकाळी Karl Marx राहिला होता)जवळ आणि
ब्रिटिश airboarne ची पहिली खेप इंग्लंडमधील वेगवेगळ्या विमानतळ वरून
- अशा तीन ठिकाणांहून निघाल्या आणि व्यवस्थापन शास्त्रातील Murphy Law (all that can go wrong will go wrong; and the most crucial thing will go wrong at the most crucial time ) ह्या उक्तीची प्रचिती येऊ लागली.

अर्न्हेमला पहिली खेप व्यवस्थित उतरली पण जी तुकडी धावा करणार होती, तिच्या jeeps आणणारे glider कोसळले आणि त्यांना पायीच पुलाकडे जावे लागले. त्यानंतर आपली बिनतारी यंत्रणा काम करत नाही आहे असा त्यांना साक्षात्कार झाला. आपल्या विखुरलेल्या सैन्याची बातमी मिळत नाही असे पाहून डिव्हिजनचे सेनापती Major General Roy Urquhart थोडी कुमक घेऊन आपल्या मुख्यालयापासून पुढे गेले आणि परत येताना एका घरात अडकले कारण त्याच्या सभोवती जर्मन सैन्य गोळा झाले. अशा प्रकारे युद्धाच्या महत्वाच्या क्षणी सेनापती ३६ तासां साठी युद्धाचे संचालन करू शकला नाही.

इकडे ऱ्हाईन नदीवरील पुलावर, पहिल्या पॅराशूट ब्रिगेडच्या दुसऱ्या बटालियनचा Lt Col Robert Frost ने कब्जा मिळवून पुलाच्या नदीपलीकडील उत्तर टोकावर मोर्चे बांधले. पुढे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ४ रात्री आणि ३ दिवस हा मोर्चा लढविला. आजही हा पूल Robert Frost Bridge म्हणूनच ओळखला जातो.

प्रतिकूल हवामानामुळे पहिल्या डिव्हिजनच्या पुढील दोन खेपा यायला उशीर झाला व Frostचे सैन्य आणि उरलेले डिव्हिजन ह्यांच्या मध्ये जर्मन सैन्यांनी मुसंडी मारली. शेवटी काही पर्याय न राहिल्यामुळे सगळे सैन्य नदीच्या उत्तरेकडे Oosterbeek परिसरात डिव्हिजनचे मुख्यालय असलेल्या Hartenstein हॉटेलच्या अवतीभोवती लावले गेले. काही दिवसांपूर्वी हे हॉटेल जर्मन सैन्याच्या पश्चिम आघाडीच्या सरसेनापती Model चे मुख्यालय होते.

इकडे मोहिमेच्या Garden भागाच्या मोर्च्यावर सुद्धा अडचणी आल्या होत्या. सुरवातीला असलेल्या Wilhelmina कॅनॉल वरील Son येथील पुलाला उडविण्यात जर्मनांना यश मिळाले व ३०व्या कोरची आगेकूच थंडावली. पुढे Nijmeganला असलेल्या Waal नदी वरील पूल जिंकणे अवघड झाल्यामुळे नदी ओलांडून पलीकडे जाण्याचे ठरविले गेलेपण त्या साठी लागणाऱ्या नावा पिछाडीहून आणण्यात एक दिवस गेला.
Bridge on the river Waal at Nijmegan

शेवटी  परिसरात परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी Garden सैन्य ऱ्हाईन नदीच्या उत्तरकाठावर पोहोचण्याची शक्यता मावल्यामुळे ही संपूर्ण मोहीम गुंडाळण्याचे ठरविले गेले व Oosterbeek परिसरात अत्यंत शूरपणे लढणाऱ्या आणि मोठी प्राणहानी झालेल्या १ British Airborne Division ला दिनांक २५ सप्टेंबर १९४४ला ऱ्हाईन नदीच्या उत्तरेकडूननदी ओलांडून दक्षिणेच्या Driel गावीं परत येण्याचे फर्मान काढले गेले व एका अत्यंत संघर्षपूर्ण चढाईचा शेवट झाला.

उपसंहार:
Operation Market Garden मध्ये ७००० जर्मन सैनिक जायबंदी झाले किंवा मृत्यू पावले.दोस्त राष्ट्रांच्या अर्न्हेमला उतरलेल्या १०००० सैनिकां पैकी २१६३ परत गेले, ६६३७ युद्धकैदी झाले व १२०० आज ही त्या परिसरात चिरनिद्रा घेत आहेत.हे हिटलरने जिंकलेले शेवटचे युद्ध ठरले.

पुढच्या दिवसांमध्ये अर्न्हेमच्या नागरिकांनी बऱ्याच ब्रिटिश सैनिकांना परत आपल्या सेनेत परत जाण्यात मदत केली. जर्मनांनी नागरिकांवर बरेच अत्याचार केले. अन्न पुरवठा थांबवला; संपूर्ण अर्न्हेम काही दिवसांसाठी रिकामे केले.

ही मोहीम यशस्वी झाली असती तर कदाचित पुढचा इतिहास बदलला असता. अँग्लो-अमेरिकन सैन्यांनी संपूर्ण जर्मनी जिंकले असते व पुढे काही दशके चाललेले शीतयुद्ध कदाचित टाळले गेले असते.
ब्रिटिश सैन्याच्या इतिहासात Operation Market Garden ला तेच स्थान आहे जे मराठ्यांच्या इतिहासात पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला आहे. त्या पिढीच्या सैनिकांमघ्ये अत्यंत अभिमानाने सांगितले जायचे, " I fought at Arnhem."

७५ वर्षां नंतर:
Commorative coin 
दिनांक २१ सप्टेंबर १९ला हॉलंड मधील Ede ह्या गांवी, Operation Market Garden चढाईला ७५ वर्षें झाल्याला एक समारंभ झाला होता व मला त्यांत उपस्थित राहता आले. मुख्य अतिथी म्हणून ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स व हॉलंडच्या महाराणी बिएट्रिक्स आल्या होत्या. विशेष म्हणजे तेथे असलेल्या स्मारकावर पुष्पचक्र वाहणाऱ्या लोकांमध्ये जर्मनांशी लढणाऱ्या एका डच भूमिगत कार्यकर्त्याची मुलगी आणि त्या युद्धात भाग घेतलेला एक ९५ वर्षांचा सैनिक पण होता. 
Paradropping on 75th anniversary
तसेच मला Nijmegan आणि अर्न्हेम परिसरात हिंडायला मिळाले. त्यांची छायाचित्रे सोबत देत आहे.

References:
1.   Arnhem by Maj.-Gen R.E.Urquhart ( Commander 1st British Airborne  Division.)
     2.  A Bridge Too Far by Cornelius Ryan.

                                               दिलीप कानडे



2 comments:

  1. व्वा फार छान माहीती

    ReplyDelete
  2. सुंदरच लेखन! फक्त हे लेख सिक्वेन्स ने वर्षाप्रमाणे असते तर अजून छान झाले असते!

    ReplyDelete