Berlin on the day of surrender |
बरोब्बर ७५ वर्षांपूर्वी, ३० एप्रिल १९४५ ला, हिटलरने, पिस्तूलाने
गोळी झाडून आत्महत्या केली. त्या आधी त्याने नौसेनाध्यक्ष, ऍडमिरल
कार्ल डोनिट्झ ह्यांस आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले. त्या
वेळेस रशियन सैन्यांनी जवळ जवळ पूर्ण बर्लिनचा ताबा मिळविला होता व पश्चिमेस, इंग्लंड-अमेरिकेच्या
फौजा एल्ब नदीच्या काठी तळ ठोकून होत्या. बर्लिन दोस्तराष्ट्रांच्या अधिपत्याखाली
गेल्यामुळे डोनिट्झनी आपली राजधानी उत्तर-पश्चिमेकडे फ़्लेन्सबर्ग येथे
हलविली आणि तेथून दोस्तराष्ट्रांकडे संपूर्ण शरणागतीची याचना सुरू केली.
Germany_s surrender at Reims |
त्या
करिता त्याने आपला प्रतिनिधी म्हणून ऍडमिरल फ़्रिडबुर्ग ह्यांस
जनरल आईझेनहॅावर, Supreme Commander of Allied Expeditionary Forces (SCAEF) ह्यांच्या
तळावर रीम्स येथे पाठविले. त्यांस जर्मनांनी तात्काळ, सर्व
मोर्चांवर एकाच वेळी व कोठल्याही अटींविना शरणागतीस मान्यता द्यावी असे सांगण्यात
आले. नंतर आईझनहॅावर ह्यांची समजूत काढण्यासाठी जनरल जोडल् तेथे आला. ह्या
वेळकाढूपणास तोडगा म्हणून दोस्त राष्ट्रांतर्फे
दि. ६ मे
रोजी रात्री ९ वाजता
असे जाहिर केले गेले कि शरणागती मान्य न केल्यास दि. ८ मे
मध्यरात्रीपासून तोफा पुन्हा धडाडू लागतील. हा निर्वाणीचा संदेश मिळाल्या बरोबर, डोनिट्झनी
जोडलला विनाअट शरणागतीच्या कागदपत्रांवर सही करण्याचे आदेश दिले.
अशा प्रकारे, शरणागतीच्या पहिल्या मसुद्यावर, फ्रांस मधील, रीम नामक गावी, SHAEF (Supreme Headquarters of Allied Expeditionary Force)च्या तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयात असलेल्या मुख्यालयात दि. ७ मे १९४५ ला पहाटे ०२.४५ वाजता स्वाक्ष-या झाल्या. तसेच वरील शरणागती दि. ८ मे १९४५ रोजी २३:०१ वाजल्या पासून अमलात येईल, असे नमूद करण्यात आले. ह्या पुढे शरणागतीच्या मसुद्यात असे पण नमूद करण्यात आले कि दोस्त राष्ट्रांचे सेनापती ठरवतील त्या दिवशी, त्या वेळी व त्या ठिकाणी जर्मनीच्या जल, थल व वायुसेनेच्या प्रतिनिधींद्वारा ह्या शरणागतीच्या मसुद्याला पुनर्मांन्यता देण्यात येईल.
सही
करणा-या जर्मन अधिका-याचा दर्जा, ज.आयझनहॅावरहून खालचा असल्यामुळे
त्यांच्यावतीने ज.वॅाल्टर बेडेल स्मिथ व सोव्हिएट रशियाच्या
सैन्यप्रमुखांच्यावतीने ज. ईव्हान सुस्लोपराव यांनी सह्या केल्या.
हे
सगळे सोपस्कार पूर्ण होण्याच्या सहा तासांत, "हा शरणागतीचा मसुदा आपणांस
मान्य नाही" असे रशियन सेनापतिंनी कळविले. त्यांचा आक्षेप मसुद्यात, युद्ध
जिंकण्यात रशियन सैन्याच्या प्रमुख भूमिकेचा सविस्तर उल्लेख नसल्याबद्दल होता.
तसेच वरील शरणागती जर्मनीने पादाक्रांत केलेल्या ठिकाणी न होता, राजधानी
बर्लिनमध्ये व्हावी असे त्यांचे मत होते. त्याशिवाय, जर्मन सैनिकांनी आपली
शस्त्रे उतरवून युद्धबंदींच्या स्वरूपात शरण यावे, असा पण रशियन
सैन्याधिका-यांचा आग्रह होता.
तस्मात्,आयझनहॅावर
यांनी जर्मनीच्या तिन्ही दलांच्या सरसेनापतिंना,फ़्लेन्सबर्गहून,बर्लिनला ८ मे १९४५ रोजी,सकाळी
पाठवण्याची व्यवस्था केली. तेथे त्यांना दोस्तराष्ट्रांच्या प्रतिनिधी मंडळाची वाट
पहात रात्री दहापर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. वरील समारंभाचे अध्यक्षपद रशियन
सेनापती मार्शल ग्रेगरी झुकॅाव्ह यांच्याकडे होते. पण त्यांचा दर्जा स्वत:हून कमी
असल्यामुळे, आयझनहॅावर
यांनी त्यांचे ब्रिटीश उपप्रमुख, एयर चीफ मार्शल टेडरना पाठविले होते.
Table on which it is done |
surrender papers were signed in Berlin. Table on which it is done(Photo in picture) |
अशा
प्रकारे ८ मे १९४५ हा
दिवस, V.E day (Victory in
Europe day) म्हणून अजरामर झाला.
ता.क:
जर्मनीचा पाडाव होऊनही द्वितीय महायुद्ध थांबलेले नव्हते.
पूर्वेत जपान अजूनही लढतच होता. (लेकिन वो किस्सा फिर कभी)
दिलीप कानडे
संदर्भ
व छायाचित्रे:
1. Last battle: by
Cornelius Ryan.
2. Wikipedia.
Nice article Dilipji
ReplyDelete