पॅरिेसची मुक्तता

पार्श्वभूमी : ६ जून १९४४ ला दोस्त राष्ट्रांनी आपले सैन्य उत्तर फ्रान्समध्ये नॉर्मनडीच्या  समुद्र किनाऱ्यावर उतरवले. सुरुवातीच्या बेसावध परिस्थितीनंतर जर्मनीच्या सैन्यानी कडक प्रतिकार सुरू केला व कांन नावाचे शहर जिंकायला ऑगस्ट उजाडला. त्या नंतर मात्र दोस्तांनी मुसंडी मारून दक्षिण पूर्वे कडे आपली घोडदौड आरंभली. आता त्यांचे लक्ष लवकरात लवकर जर्मनीच्या वेशीवर पोहचून हे युद्ध ह्या वर्षीच संपवण्यावर केंद्रित होते.    दोस्त सैन्याचे सरसेनापती आयझेनहॉवर ह्यांना ते शहर जिंकून आपला तोकडा रसद पुरवठा तेथील नागरिकांमध्ये वाटून आणखीन कमी करावयाचा नव्हता. तसेच कोठलेही शहर जिंकणे अवघड असते व त्यात जास्त मनुष्यहानी होते ह्याची त्यांना कल्पना होती.
चोलटीझ HQ  
इकडे पॅरिसमधली जर्मन सेनापती व्हॉन चोलटीझची स्थिती  "इकडे आड तिकडे विहीर" अशी झाली होती. त्याची नेमणूक करताना हिटलरने स्पष्ट आज्ञा दिली होती की कोठल्याही परिस्थितीत पॅरिसमधला जनतेचा उठाव रोला गेला पाहिजे. जनतेवर जरब बसविण्यासाठी असीम बळाचा वापर करावा. त्यासाठी कार्ल नावाच्या तोफेची  पाठवणी केली होती. ही  तोफ २.५ टन गोळा ३ मैल लांब फेकू शकत होती. पॅरिसच्या सगळ्या पुलांवर व ऐतिहासिक इमारतींवर स्फोटके पण  पेरून झाली होती. पण चोलटीझला जर्मनी हे युद्ध हरणार हे दिसून आले होते व त्याला  विनाकारण शहरी लढाईत आपल्या शिपायांचे जीव गमवायचे नव्हते. शिवाय पॅरिसच्या उद्ध्वस्ततेसाठी आपण जबाबदार ठरल्यास मित्र राष्ट्रे आपल्याला कसे वागतील हे पण त्याला ठाक होते. दुसऱ्या बाजूस हिटलरची आज्ञा न मानणाऱ्या सेनापतीचे आणि त्याच्या परिवाराचे काय होते हे त्यानी पहिले होते.

आपल्या  मुक्ततेसाठी लढणा
ऱ्या फ्रेंच लोकांचेसुद्धा दोन तट होते. फ्रान्सच्या बाहेरून द-गॉल ह्यांच्या नेतृत्वा खालील फ्री-फ्रेंच  व कम्युनिस्टांचे वर्चस्व असलेली पॅरिसमधील जनता. द-गॉलना दोस्त राष्ट्रांनी जरी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या दर्जा दिला असला तरी, त्यांच्या आडमुठेपणाला व सामरिक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या स्वभावाला सगळे कंटाळले होते. कम्युनिस्टांना उठाव करून पॅरिस ताब्यात घ्यायचे होते ज्यायोगे पुढील काळात द-गॉलना शह देता यावा.

अशा परिस्थिती
दिनांक १८ गस्ट १९४४ला पॅरिसच्या पोलिसांनी आपल्या मुख्यालयावर, राष्ट्रध्वज उभारून बंड पुकारले व लोकांनी जर्मन सैनिकांना एकटे गाठून ठार करणे सुरू केले. हा उठाव रोण्यासाठी जर्मन सैन्यांनी उखळी तोफा व टॅंकचा वापर सुरू केला व प्रचंड मनुष्यहानी होऊ लागली. ही परिस्थिती पुढचे पाच दिवस राहिली. दोस्त सैन्य अजून पॅरिस पासून बरेच लांब होते, तसेच व्हॉन चोलटीझवर जास्त बळाचा वापर करण्यासाठी दबाव येऊ लागला होता. तिकडे रास्तेनबुर्गच्या आपल्या मुख्यालयातून, "पॅरिस उद्ध्वस्त झाले कि नाही?" असे हिटलर वारंवार विचारीत होता. 
शेवटी एका स्वीडिश कूटनीती तज्ञाने दोस्त राष्ट्रांच्या ओमर ब्रॅडले  ह्या सेनापतीची भेट घेऊन पॅरिसची परिस्थिती विषद केली आणि त्याच्या कडून दुसऱ्या फ्रेंच तोफखाना डिव्हिजनला जनरल लेक्लार्कच्या नेतृत्वाखाली पॅरिसवर चाल करून जाण्याची आज्ञा करविली. अशा प्रकारे सात दिवसांच्या नरसंहारानंतर दिनांक २५ ऑगस्ट १९४४ला पॅरिसला  मुक्तता  मिळाली. 


७५ वर्षां नंतर :

२५.८. २०१९ रोजी पॅरिसच्या मुक्ततेला पाऊणशे वर्षे झाली. संयोगाने एक ऑगस्टला मला पॅरिसला जाण्याचा व तेथील दुसऱ्या महायुद्धातील महत्त्वाची असलेली स्थाने बघण्याचा  योग आला. टूरची सुरवात पॅरिस ऑपेरा हाऊसपासून झाली. 
ऑपेरा हाऊस 

त्या चौकांत जर्मन गुप्त हेरांचे मुख्यालय असूनसुद्धा ऑपेरा हाऊसच्या बेसमेंटमध्ये उठाव योजण्याची खलबते व्हायची. 
तेथून  जवळच्या चौकात जर्मन वायुसेनेचे मुख्यालय दाखवले गेले. पुढे टुलेरीस गार्डेनच्या भिंतीवर आम्ही जर्मनांनी फाशी दिलेल्या लोकांची नावे असलेली टॅबलेट्स बघितली. 
नंतर आम्ही जर्मन सेनापतीचे मुख्यालय असलेले  हॉटेल म्युरिस पाहिले.


बुलेट मार्क्स 
तेथून सीन नदीच्या काठावरून जाताना आमच्या गाईडने तेथील इमारतींवर असलेल्या गोळ्यांच्या खुणा दाखविल्या.  सर्वांत शेवटी आम्ही प्लास-द-ला-काँकॉर्डला गेलो. 
हॉटेल क्रिलोन 

पॅरिसमधील मुख्य चौकात असलेल्या  ह्या हॉटेल क्रिलोनमध्ये पण बरीच प्राणहानी झाल्याचे गाईडने सांगितले.
हे सगळे बघत असताना एका विचारानी माझा सतत पिच्छा केला, " आपल्या देशात शहरी युद्ध झाले नाही ही किती भाग्याची गोष्ट आहे. 
किस्से :
१. उठाव करणाऱ्या लोकांमध्ये मादाम क्युरीचा मुलगा पण होता व त्यांनी त्याच प्रयोगशाळेची रसायने वापरली जेथे रेडिअमचा शोध लावला गेला. 
२.  Paris मध्ये जर्मन सैन्यानी 25 आगस्ट 1944 ला संपूर्ण शरणागति पत्करल्यावर द-गाल तेथे आले. त्यांना दोस्त राष्टांकडून राष्टप्रमुखाचा दर्जा प्राप्त होता. अशा वेळेस सर्वसाधारणपणे मोठा समारंभ होउन सैन्याकडून मानवंदना ईत्यादि सोपस्कार होतात. पण द-गाल पायी आर्क-द-ट्रायांफ पासून लोकांच्या गर्दीमधून शांम्प ऐलिसी मार्गे राष्टाध्यक्षांच्या ऐलिसी पँलेसमध्ये गेले. ह्या प्रवासांत त्याच्यावर गोळी पण झाडण्यात आला होती असा पण एक समज आहे, पण त्या बद्दल माझ्या गाईडने दूजोरा न दिल्यामुळे तेवढा उल्लेख मी टाळला.
३. पॅरिसची मुख्य ओळख असलेल्या आयफेल टॉवरवर सर्वप्रथम त्यांचं अग्निसेवक Saringuet नी राष्ट्रध्वज फडकविला ज्याला फ्रान्सच्या शरणागती नंतर दिनांक १० जून १९४१ला सकाळी ७.३० वाजता तो उरवावा लागला होता.  

दिलीप कानडे

1 comment:

  1. अतिशय सुंदर व माहितीपूर्ण लेख 😊

    ReplyDelete