आत्ताच आमचं घराचं शिफ्टिंग झालं. शिफ्टिंगचा एकमेव
फायदा असा, की काहीतरी
हरवलेलं, किंवा स्मृतीआड गेलेलं अचानक सापडतं. ह्यावेळी मला
एका पुस्तकांच्या प्रदर्शनातून आणलेला आणि न उघडता तसाच कपाटात ठेवलेला एक गठ्ठा
सापडला. त्यात वरच अरूण साधूंचं 'झिपऱ्या' होतं. ८०च्या दशकातल्या मुंबईच्या लोकल रेल्वेतल्या धावत्या जीवनाच्या
पार्श्वभूमीवर चालणारी, एका बूटपॉलीश करणाऱ्या पोराची ही
गोष्ट. पण आजही तितकीच भिडणारी.
गेले काही दिवस 'झिपऱ्या'च्या निमित्ताने माझी मुंबईच्या आठवणींची उजळणी चालू आहे. परवा असाच वाचत बसलो असता दिपू सुद्धा एक पुस्तक घेऊन आली आणि शेजारी बसून वाचू लागली. हॅरी पॉटरच्या मालिकेतलं पुस्तक होतं. त्या दिवशी रात्री जेवताना ह्या दोन्ही पुस्तकांबद्दल गप्पा रंगल्या होत्या.
"तुम्हा दोघांच्या एक लक्षात आलंय का, ह्या
दोन्ही गोष्टींत, त्यातल्या हीरोंमधे बरंच साम्य आहे."
आमच्या एकुलत्या एक प्रेक्षकाने मत द्यायला सुरुवात
केली.
"दोघंही साधारण १०-१२ वर्षांचे.
दोघंही तल्लख बुद्धीचे आणि चपळ. दोघांवरही लहान वयात आलेल्या जबाबदाऱ्या. दोघंही
आपापल्या संकटांशी न हार मानता झुंजणारे. दोघेही अतिशय धाडसी. अशा प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेली बरीच माणसे मोठेपणी यशस्वी होतात. कारण त्यांच्यात हार न मानण्याची
वृत्ती आपसुकच तयार झालेली असते."
"मम्मा, मला
पण असं tough life experience करायचंय. हीरो व्हायचंय." दिपूची निरागस प्रतिक्रिया.
"ते असं घडवून, प्लॅन करून होत नाही राणी. पण एक गोष्ट लक्षात ठेव. पुढे जेव्हा तुला कधी
असं वाटेल की एखादी situation खूप कठीण आहे, आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे, त्या वेळी घाबरून जाऊ नकोस. तीच तुझी हीरो होण्याची संधी असेल. तेव्हा तिथून पळून
नाही जायचं. तेव्हा पुढे जायचं. हीरो व्हायचं."
"I will always remember this Mamma." दोघींनी एकमेकींना टाळ्या देत म्हटले.
चांगली पुस्तकं कठीण तत्वज्ञान किती सोपं करून सांगतात ह्याचा आज प्रत्यय आला.
मानस
छान! बोध कथा लहानपणी मनावर बिंबल्या की त्याचा आयुष्यभर योग्य परिणाम होतो.
ReplyDeleteNice !!!
ReplyDeleteथोडक्यात पण मस्त.. हिरो होण्याची संधी कधी येणार? वाट पाहत आहे..
ReplyDelete