चांदणे स्वरांचे

मुग्ध चांदणे स्वरांचे उधळूनी तू देसी सुस्वर 
तुज स्वरांचा गंध केवळ मोहिनी करतो मनावर 
मुग्ध चांदणे... 

छेडिली जणू तू स्वरांची पुष्पमाला आम्रपर्णी 
रागदारीच्या सुरांनी कोवळाली आज किरणे 
लालिमा जणू प्राचीवरती सूर्यबिंबाची तरंगे 
स्वर तुझे ऐकण्या येती  स्वये ही सूर्यकिरणे 
भाट झाले मंजिरीचे अन् उषेचे जुळले सूर 
मुग्ध चांदणे...

जाईजुई अन्  नागवंती, बकुळ चाफा डोलतो 
मोहुनी मज ओढतो बघ जासवंती मंद्र स्वर तो 
पारीजातकही फुलोनि बाग जणू ही शोभतो
 मोगऱ्याची अत्तरे जणू गंधिली बघ या स्वरांवर 
मुग्ध चांदणे... 

 - प्रसन्न 



No comments:

Post a Comment