अहवाल : विविध मनोरंजन

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मित्रमंडळ बेंगळुरू मध्ये गणपती उत्सवातील कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या आगमनाने झाली. 
पहिल्या दिवशी लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित करण्यात होते. या कार्यक्रमाचा हेतू मुलांचे विविध गुण दर्शन हा असल्याने छोटे कंपनीने आपले विविध गुण हे नाच, गाणी आणि वाद्य वाजवून प्रदर्शित केले. कार्यक्रमाची सुरवात अथर्वशीर्ष पठाणाने निमिष बोडस आणि अनन्या वझे यांनी अतिशय उत्तम केली. 
हल्लीच्या मोबाईलच्या काळात जेव्हा मुलं मोबाईलवर गेम्स खेळण्यात व्यस्त असतात त्याचवेळी या दोघांनी हे पाठांतर केले या बद्दल मुलांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक वाटले. त्यानंतर जरी नवीन पिढी पाश्चात्य संगीताकडे वळत असली तरी अद्वैत देशपांडे ने दोन शास्त्रीय गाणी गाऊन सर्वाना आश्चर्याचा गोड धक्का दिला. 

त्यानंतर श्रद्धा कामटे, तनिष्का आणि सोहा या तिघींची कत्थक नृत्य सादर केले ज्याचे नृत्यदिग्दर्शन डहाळे यांनी केले होते. नंतर एक संगीताचा कार्यक्रम दोन मुलांनी सादर केला तो म्हणजे प्रणव अभ्यंकर आणि अनिरुद्ध प्रभू. त्यांनी दोन गाणी सादर केली जी ‘जब वि मेट’ आणि ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील होती. अनिरुद्ध ने सुरेल आवाजात ती गायिली आणि त्याला प्रणव ने गिटार ची सुंदर साथ दिली. 

यानंतर निमिष बोडस ने कीबोर्ड वर दोन गाणी वाजवली विशेष म्हणजे ती त्याने स्वतः बसवली होती. त्यातील एक गाणं सैराट या चित्रपटातील होते जे सर्वाना खूप आवडले. 
कार्यक्रमाची सांगता अतिशय गोड अशा भरतनाट्यम नृत्याने पर्णिका कदम या सात वर्षाच्या मुलीने केली. तिचे नृत्य व्यावसायिक स्तराचे व अतिशय प्रामाणिक होते त्यामुळे सर्वाना ते खूप भावले. प्रेक्षकांना हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत असतानाच कार्यक्रमाचा समारोप झाला. सगळे प्रेक्षक पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाचे चित्र रंगवत आपापल्या घरी गेले. 

                           माधवी अभ्यंकर




No comments:

Post a Comment