A must watch 3 minutes documentary by UNICEF

आपण विचार करतो. आपल्याला सामाजिक जाणीव आहे असा वाटणाऱ्या अनेकांचे डोळे खाडकन उघडणारा अवघ्या ३ मिनिटांचा एक विडिओ UNICEF ने प्रकाशित केला आहे. सामाजिक विचारसरणी चा अभ्यास करणाऱ्या एका ग्रुप ने एक छोटासा प्रयोग केला जो डिरेक्टली या विडिओ मध्ये दिसतो. आपण हि आपल्या नकळत कित्येकदा असेच वागतो हे आपल्याला  लक्षात येत. नकळत स्वतः ची लाज वाटते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वागण्याला भौगोलिक सीमा नाहीत. जगातील बऱ्याच भागात निदान शहरात माणसे अशीच वागतात हा अभ्यासांती निघालेला निष्कर्ष आहे. 
एक नूर आदमी आणि दस नूर कपडा हि म्हण अशा झणझणीत स्वरूपात समोर येईल असा आपण विचार हि करू शकत नाही. 

जगात तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेली हि प्रभावशाली फिल्म. 
३ मिनिटे काढून प्रत्येकाने अवश्य पाहावी अशी हि - Documentary

- गंधाली सेवक



No comments:

Post a Comment