उत्तरे
:
१.
उत्तर : राधाबाई वनारसे. सावत्र मुलांनी घराबाहेर काढल्यावर आणि स्वतःच्या हातात एक पैसाही नसताना यांनी
स्वतःच्या बळावर एक भारतीय जेवणाची मेस आणि बोर्डिंग सुरू केले. त्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊन पुढे त्या मिलेनिअर झाल्या. पुढे त्या ‘लंडनच्या आजीबाई’ या नावाने प्रसिद्ध झाल्या.
२.
उत्तर : Homai Vyarawalla. या पहिल्या फोटो जर्नालिस्ट,
ह्यांना पुढे पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. यांनी स्वतःला 'डालडा १३' हे टोपण
नाव घेतले होते.
३.
उत्तर : बचेंद्री पाल. त्यांनी
M.A. B.Ed. पर्यंत शिक्षण घेतले होते आणि त्या शिक्षिका म्हणून कार्यरत
होत्या. पुढे घरच्यांचा विरोध पत्करून व्यावसायिक गिर्यारोहक
हे करीयर त्यांनी निवडले. बचेंद्री पाल यांना पद्मश्री,
अर्जुन अवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
४.
उत्तर : केसरबाई केरकर. यांचे 'जात कहाँ हो' हे सुंदर गाणे
त्या रेकॉर्डमध्ये अमर झाले आहे. या सीडी मध्ये बीथोवन,
बाख, मोझार्त या दिग्गजांचेही संगीत
आहे. व्हॉएजर १ चाळीस वर्षांपासून अवकाशात फिरत आहे आणि अजूनही
तिकडून माहिती पृथ्वीवर पाठवत आहे.
५.
उत्तर : भानू अथैय्या. (Bhanu
Athaiya). यांना गांधी चित्रपटातील वेशभूषेसाठी 'बेस्ट कॉस्च्युम डिझाइन' अकॅडमी अवॉर्ड मिळाले.
(shared with Jhon Mollo.).
६.
उत्तर : कमलाबाई गोखले.
दादासाहेब
फाळके यांच्या 'मोहिनी भस्मासूर'मध्ये
त्यांनी मोहिनीची भूमिका केली होती. याच सिनेमामध्ये त्यांची
आई दुर्गाबाई कामत यांनी पार्वतीची भूमिका केली होती. प्रसिद्ध
नट चंद्रकांत गोखले म्हणजे कमलाबाईंचा मुलगा आणि विक्रम गोखले त्यांचा नातू.
७.
उत्तर : पी. टी. उषा १९८४ स्त्रियांची
'४०० मीटर्स अडथळ्यांची शर्यत' या विभागात फायनलमधे
पोहचणारी पहिली भारतीय महिला होती.
८.
उत्तर : झूलन गोस्वामी. हिने
पद्मश्री, अर्जुन अवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
९.
उत्तर : कमला सोहोनी. ह्यांनी
१९३९ साली केंब्रिज विद्यापीठातून मधून
PhD मिळविली. त्यांना सर सी. व्ही. रामन् यांनी
IISc मध्ये प्रवेश नाकारला होती. सत्याग्रह
करून त्यांनी प्रवेश मिळवला.
No comments:
Post a Comment