Green bee eater किंवा
वेडा राघू हा भारतात मोठ्या प्रमाणात दिसणारा पक्षी आहे. उष्ण कटिबंधातील बऱ्याच
देशांमध्ये यांचे वास्तव्य आढळते.
हा पक्षी हिरव्या रंगाचा असून त्याची शेपटी एका
रेषेप्रमाणे असते. किडे खाणाऱ्या पक्षांच्या सव्वीस प्रजातींपैकी एक महत्त्वाची
प्रजात म्हणजेच वेडा राघू.
लहान लहान थव्यांमध्ये वास्तव्य करणारा हा पक्षी अत्यंत
बुद्धिमान पक्षी म्हणून ओळखला जातो.
अभिनय पाध्ये
No comments:
Post a Comment