नाक


नकट्या नाकावर रागच फार,
कोपऱ्यात जाऊन बसलंय पार
आत काय दडलंय
कुणी विचारलंय
सगळ्यांनी केली मनधरणी
केली खुशमस्करी
नाकेली आहे, चाफेकळी आहे
सरळ आहे, तरतरीत आहे
शिवरायांसारखे धारदार आहे
बसकं आहे, फेंदरं आहे, पोपटनाक पण आहे
एक वात्रट पोरगं म्हणालं
हे मात्र फार झालं, नाकाला झोंबू लागलं
नाक एकदम बोलू लागलं
नथ आहे माझीच मक्तेदारी
कानाने चोरली, साखळीच्या पदकाने चोरली
बिन्दीने चोरली, जोडव्याने चोरली (पायातल्या)
माझ्या हक्कावर आणली गदा
बोलू लागले अद्वातद्वा
सगळे हसले खदखदा
बदलला आहे जमाना
प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू नका
कांदे तर मुळीच सोलू नका
पाणी बाहेर येईल
तुमचीच फजिती होईल
नाकीनउ येईल
आहे तिथेच राहून जा
उंचावत जा, उंचावत जा
माणसाची नि देशाची शान
आहे तुमच्या हातात – नव्हे नाकात !!

अंजली टोणगांवकर


No comments:

Post a Comment