मेघनाद हा गर्जे भीषण
वाढवतो हृदयाची धडकन
चमके आकाशी बिजली
वर्षेत अवनी चिंब भिजली
अनिल वाहे तुफानापरी
भरून वाहतो चराचरी
मृदगंध मनास मोहवितो
वरा तनु ही शांतवितो
वर्षेची होता वर्ष-भेट ती
प्रसन्नतेने हसते धरती
अंकुर येता मातीतून वरती
हिरव्या पायघड्या पसरती
ऋतू असा हा मिलनाचा
नभ-धरे च्या आनंदाचा
तन - मनास जो शांतवितो
सृजन महोत्सव सुरु रहातो.....
-------------------------------------
अनघा
No comments:
Post a Comment