साद देती हिमशिखरे






गीत: वसंत कानेटकर
संगीत: पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर: रामदास कामत
नाटक: मत्सगंधा
कट्ट्यासाठी आवाज: सुकृत ताम्हणकर


शब्द
साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची
क्रमिन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची

कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची
अढळ त्या ध्रुवावरती दृष्टि यात्रिकाची
मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची

स्वप्‍न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे
वाटते आता होते पतन या मनाचे
मृगजळात का भागे तृषा तृषार्ताची ?


कट्ट्यासाठी आवाज-- सुकृत ताम्हणकर


No comments:

Post a Comment