कृष्णाआधी बोला राधा
अद्वैताचे नाम सर्वदा
त्याला सल अन्
तिज रूते काटा...
गूज मनीचे मनी उमटते
शब्दांची ना गरज भासते
जेथे तेथे ठायी ठायी
सखयाच्या असण्याची ग्वाही...
पापण्यां मधे राधा लपली
अश्रूंचीही वाट रोखली
झरले जर ते.. ती दुःखी होईल
भाव मनीचे असेच विरतील...
कृष्ण जाहला राधार्पण अन्
राधा झाली कृष्णार्पण ती
एकत्वाची करू आरती...
अहंकार तो नसो सोबती....
सार कथेचे उत्कट मंगल
आनंदाचे जपावे क्षण...
नितळ पाटी ह्रदयाची ठेवून
राधार्पण मी कृष्णार्पणही....
No comments:
Post a Comment