साहित्य, कला आणि संगीताचा इंद्रधनुषी आविष्कार
नमस्कार
मंडळी,
नुकतीच गणेशोत्सवानिमित्य आपली आवडती स्मरणिका प्रकाशित
झाली. तुम्हाला ती खूप आवडली हे आवर्जून कळवल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
"मित्रमंडळ-कट्टा"
अंक परत दिवाळीपासून प्रकाशित
करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात दिवाळी म्हटले की
फराळ, फटाके, नवीन कपडे, आकाशकंदील रांगोळी, मेहंदी व दिवाळी अंक लगेच डोळ्यासमोर
येतात, त्याशिवाय दिवाळी होतच नव्हती. पण गेल्या दहा-बारा वर्षाच्या कालावधीत सगळ्या
चालीरिती मध्ये बरीच स्थित्यंतरे आली. तशीच दिवाळी अंकामध्येही. जुन्या-नव्याचा समसमासंयोग म्हणून यावेळी दिवाळी अंकच पण पूर्णपणे ऑनलाईन आम्ही
घेऊन आलो आहोत.
ह्यावेळी कथा, कविता, चिंतन
करायला लावणारे लेख, चित्रकला, नृत्य, चित्रपट, नाट्य आणि संगीत अशा निरनिराळ्या कलाक्षेत्रांचा आपण कट्यावर
आस्वाद घेणार आहोत.आपण ह्या वेळी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. यामुळे या अंकात काही गाणी,
काही दृश्य याचाही समावेश असेल. अंकात वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा आम्ही
प्रयत्न केला आहे. नवीन technology
दृकश्राव्य कलाकृती
- audio
and video चा आपण चा वापर करणार आहोत.
ह्या अंकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख- mixed bag आम्ही घेतले आहेत. याशिवाय आम्ही ह्या अंकापासून काही सदरे चालू करत आहोत - terrece
gardening, साडी विशेष ही देखील
वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील.
ह्या अंकाचे विशेष म्हणजे खास घेतलेल्या दोन मुलाखती - सौ.लीना
सोहोनी व गंधाली करमरकर. दोघींनीही वेगळ्या वाटा
निवडलेल्या आहेत. लीनाताई अनुभवी आहेत, त्यांनी जो मार्ग निवडला त्यात
त्या अतिशय यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्या सर्वच पुस्तकांच्या भरपूर आवृत्या निघोत
ह्या शुभेच्छा. गंधालीनेही वेगळी वाट
स्वीकारली आहे, तिच्या
भावी वाटचालीमध्ये भरपूर यश मिळो ह्या तिला शुभेच्छा.
तर मंडळी, आमच्या कट्ट्यावर जरूर या आणि
आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका तसेच तुमच्यापैकी कुणाला स्वलिखित
कथा, कविता, कोडे, गाणी, व्हिडीओ हे
कट्ट्यावर यावे असे वाटत असतील तर आम्हाला mitramandalkatta@gmail.com
ह्या इमेलवर जरूर पाठवा.
आपलीच,
या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखांमधे
मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणार्या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक
मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.
No comments:
Post a Comment