नवलकोलची कोशिंबीर


साहित्य  
कोवळे नवलकोल , ओले खोबरे , वाटलेली हिरवी मिरची, तिळाचे कूट,  दाण्याचे कूट, दही, दूध, लं-लसूण पेस्ट, साखर, मीठ फोडणीचे साहित्य.

कृती
प्रथम नवलकोल मधोमध आडवा कापून खवून घ्यावा (नारळाच्या वाटी प्रमाणे). खोवलेल्या नवलकोलमधील पाणी पिळून काढून टाकावे, म्हणजे त्याचा उग्र वास कमी होतो. त्यात ओले खोबरे, तीळकूट, दाण्याचे कूट, लं-लसूण पेस्ट, दूध, दही, मीठ , साखर, घालून मिश्र चांगले कालवून घेणे. वरून हिंग-जिऱ्याची फोडणी द्यावी.

संगीता कार्लेकर

No comments:

Post a Comment