आनंदासाठी जगूया - आजचं 'आज' !

'आज'चा आनंद माहीत नसल्यामुळे किंवा जगण्याचे धाडस नसल्यामुळे माणूस काळाची ओझी - संबंध, कल्पना, स्थिती, अपेक्षा यांचे ओझे डोक्यावर घेऊन जगताना दिसतो. तसेच 'उद्या' विषयीच्या कल्पना, चिंता, काळजी, अनिश्चितता यांचीही ओझी माणूस वाहत असतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्या मध्ये माणसाचे जीवन चालू असते त्यामुळे तो जगत असतो, पण खऱ्या अर्थाने 'आज' जगणारे खूप कमी! कारण 'आज' जगणारेच केवळ सरळ, सहज, अधिक आनंदी जीवन जगू शकतील. तो 'आज' कसा जगायचा आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा ह्याचा उहापोह पेठे काकांनी त्यांच्या 'आज' ह्या लेखात केला आहे.


त्यांचा 'आज' हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


पेठे काकांबद्दल 

डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली. त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळ, नाम शिबिरे, प्रश्नोत्तरसत्रे, पदयात्रा, हरिजागर, आत्मपरीक्षण शिबिरे, मुलांची शिबिरे, चिंतनसत्र, चर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ  सीडींचे प्रकाशन झाले आहे.

No comments:

Post a Comment