सांजवेळ येता जवळी
आठव होते स्वगृहाची
जिथे मानव मिळवी
मनःशांती तयाची
जिथे मानव मिळवी
मनःशांती तयाची
दिसण्या असती भिंती खंबीर
जिव्हाळा ओलाव्याच्या चार
जिव्हाळा ओलाव्याच्या चार
प्रवेशद्वारी मोहरली बोगन
वसे "अतिथीदेवो" भाव
वसे "अतिथीदेवो" भाव
ओढ लावी घराची जीवा
देऊन घराला घरपण सदा
देऊन घराला घरपण सदा
वाट पाही गृह-लक्ष्मी दारी
घरात नांदे सदैव, प्रसन्नता.
घरात नांदे सदैव, प्रसन्नता.
पाऊले घराकडे चालती
अंगणी बागडती पाखरे
बळ पंखात भरुनी उद्या "ती"
भरारी घेतील यशाकडे.
अंगणी बागडती पाखरे
बळ पंखात भरुनी उद्या "ती"
भरारी घेतील यशाकडे.
कितीही असो आरामदायी
पंचतारिक निवास गृहे
फिरुनी येता स्व-गृही
स्वर्गीय आनंद घरीच मिळे
सायंकाळी तेवते देव्हा-यात
भाव भक्तीची सांज वात
पहाट प्रहरी सदा गुंजते
ज्ञानेश्वरीची सुरेल साथ
पहाट प्रहरी सदा गुंजते
ज्ञानेश्वरीची सुरेल साथ
काडी काडी गोळा करुनी
जशी बांधती पक्षी घरटी
प्रेमाने, स्नेहाने घट्ट विणती
घरातील परस्परांशी नाती.
जशी बांधती पक्षी घरटी
प्रेमाने, स्नेहाने घट्ट विणती
घरातील परस्परांशी नाती.
- वैशाली वर्तक
No comments:
Post a Comment