ओंकार



परम्यात्म्याचे नामरूप असा ओंकार तू
निराकाराचा साकार झालेला शब्द तू
सर्व शब्दांची जननी असा महामंत्र तू
स्थूल-सूक्ष्म-कारण-तुर्या अवस्थांचे प्रतिक तू
अखंड ब्रह्मांडातील एक अनाहत ध्वनी तू
छंदामधले लपलेले  ध्वनीचे  सार तू
त्रिकालाबाधित एकसत्य अशी ज्ञानज्योती तू
गीतेने गौरवलेला एकाक्षर ब्रह्म तू
तूच अनादी, तूच अनंत, आत्मतत्वाचा साक्षात्कार तू
परम्यात्म्याचे नामरूप असा ओंकार तू

**************************************************
 
 सौ. मंजिरी विवेक सबनीस

No comments:

Post a Comment