तेंव्हा आकंठ बहरलेला
धुंद श्वासांतून
दरवळलेला
दिवसरात्र चमचमणारा
दारातला जाईचा बहर,
तो तूच का?
ढगांआडून मला न्याहाळणारा
माझ्या खिडकीत डोकावणारा
हळुवार झुळूकेनी
जागवणारा
जिथे तिथे मला शोधणारा
चंदा, बोल, तूच ना?
हिरव्या तुषारांनी
गहिवरणारा
सरसर सरींत भिजवणारा
गडगड विजांत सावरणारा
नकळत सुखावणारा शहारा,
तूच असायचा ना!
गर्दीत एकांतात लाजवणारा
स्वप्नात येऊन जागवणारा
श्वासांसारखा जाणवणारा
सांग तर खरं,
तो तूच होता ना?
No comments:
Post a Comment