संकल्प कविता - मोबाईल व्रत


पाहून, वाचून, ऐकून खूप सारे अनुभव 
लोकांचे मी पण ठरवले, ठरवले काय निश्चयच केला 
मनाच्या कोपऱ्यात 
मी पण करणार एक मोठा संकल्प 
जो ऐकताना वाटेल एकदम मेगा 
आणि पूर्ण करताना तोंडचं पाणी जाईल पळून . . .॥१॥

मी विचार करायला लागले कोणता बरं करू संकल्प 
जो दुसऱ्यांना ऎकवेन मीठ मसाला लावून 
माझी कॉलर पण होईल टाइट 
बघतील जेव्हा ते डोळे विस्फारून 
असेल तो सर्व संकल्पांपेक्षा आगळावेगळा अन् हटके ॥२॥

स्त्रियांसाठी काय आहे सर्वात महाकठीण 
गप्पा करणे, वाद घालणे, भांडण करणे, लावालावी करणे शॉपिंग करणे, मेकअप करणे, आरशात स्वताहाला निरखणे सोडून देईन सर्व काही हा तर आहे हातचा मळ 
आरामात करेन सारे काही काढणार नाही पळ
पण निव्वळ विचार करताना सुद्धा
हृदयातली धडधड का वाढू लागली 
श्वासातील गती का चढू लागली 
शेवटी उत्तर दिले माझ्या अंतर्मनाने 
अगं हे तर आहेत स्त्रियांचे मूलभूत अधिकार 
यावर आघात करणं कोणाला बरे पटणार ॥३॥

मग आला मनात एक तुफानी विचार 
का नको बंद करून चोवीस तासांकरिता 
म्हणजेच एक पूर्ण दिवसांकरिता मी माझा 
व्हॉट्सअॅप, फेसबुक ट्विटर अन् मोबाइल 
विचार करताना सुद्धा डोळ्यासमोर आली अंधारी 
वाटले खचाखच गर्दी मध्ये पण मी आहे एकटी ॥४॥

लोकांचा असतो संकल्प काही दिवसांकरिता 
महिन्यान करता किंवा एका वर्षाकरिता 
पण मी केलेला हा संकल्प होता केवळ एक दिवसाचा 
होता पण तोडीस तोड 
खरच असं नाही की मोबाइल बंद नाही होत 
कधी हरवून जातो खराब होतो चार्ज संपतो 
पण सगळं काही शाबूत असता 
मोबाइलच्या सुविधांपासून दूर राहणे 
हाच तर आहे या महान संकल्पाचा बाज ॥५॥

ओके डन ठरलं तर मग 
आज रात्री बारा वाजल्यापासून 
उद्या रात्री बारा वाजेपर्यंत 
मी माझा मोबाइल बंद ठेवणार 
अर्थात मी मोबाइल व्रत करणार 
या मध्ये मला मोबाइलच्या सकळ सुविधांपासून वंचित ठेवावे लागणार 
त्याच्या रिंगटोन ला विसरावे लागणार 
त्याच्या स्क्रीनकडे दुर्लक्ष करावे लागणार 
मनातल्या मनात हरखूनच गेले 
स्वतःला महान समजायला लागले 
कारण इतक कडक व्रत करणारी 
मी अनोखी स्त्री ठरणार होते ॥६॥

मध्यरात्र संपली सकाळ झाली
दुपार हि गेली संध्याकाळ संपत आली 
रात्रीचे बारा वाजणार होते 
मी माझे मोबाइल व्रत तोडणारच होते 
उदबत्ती पेटवली पूजा केली 
आणि मोबाइल ऑन करणार नि माझि झोप मोडली 
अरे हे काय हे तर स्वप्न होतं 
कोई बात नहीं 
स्वप्नात का असेना मी मोबाइल व्रत पूर्ण तर केलं 
संकल्प तडीस नेला ॥७॥

                           - शालिनी चिंचोरे  

No comments:

Post a Comment