"उद्यापासून नक्की डाएट चालू करेन हां! प्लीज, प्लीज आज खाऊ दे न
मला, प्लीज प्लीज एकदाच... "
हा रोजचा संवाद. अर्थात माझाच माझ्याशी चाललेला. एक मन बोलतंय खा... एक मन बोलतंय नाही, डाएट कर...
मी... मी अर्थातच "खा" बोलणाऱ्या प्रेमळ मनाचं ऐकणार!
गेले 6 महिने त्याचंच तर ऐकतेय.
मी तशी बारीकच लहानपणापासून. म्हणजे उंची माझी भली मोठी, 5'10" वगैरे. आणि त्यात माझं वजन म्हणजे 45 किलो.
पाप्याचं पितर, कपडे घातलेली काठी वगैरे वाट्टेल ती नावं मला मिळालीत.
जॉब लागल्यानंतर मात्र माझं वजन बसून बसून जे वाढलं की मी बोलू लागले, "दाखवाच मला हडकुळी बोलून!"
पण हे वजन "छान भरली हो पोरगी" पासून "हेल्दी आहे जरा" आणि मग "चांगलीच जाडी झालीयस गं तू" पर्यंत गेलं तेव्हा मात्र मी हादरले. वजनाचा काटा 65 पासून 75 ते थेट 80 पर्यंत गेला. आता सर्व कपडे घट्ट होऊ लागले... कोणीतरी सल्ला दिला- डाएट कर.
झालं, मी डाएट सुरू केलं. म्हणजे तसा संकल्प केला हो!
मस्त ऑफिसातून येताना गाजर, काकडी, लेट्यूस , बीट वगैरे घेऊन आले. "आता उद्यापासून फुल्ल ऑन डाएट करू या." असं म्हणून झोपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला धावत पळत पोचले तेव्हा मैत्रिणीने बहिणीला मुलगा झाल्याचे पेढे वाटले. मस्त मऊ मऊ, केशरी पेढे! आहाहा... काय सुरेख कलर होता. पण संकल्प म्हणजे संकल्प.....मी फक्त 5 च पेढे खाल्ले. दुपारी डब्ब्यात आणलेले फक्त आणि फक्त सलाड खाल्ले. शेजारच्या टेबलावरची पाटलीण म्हणे, "काय गं, डाएटबिएट काय ते करतेय वाटतं! कर कर, तू कसली बारीक होतेयस! ह्याह्याह्या!"
टवळी मेली... दाखवतेच तुझ्या नाकावर टिच्चून वजन कमी करून. संकल्प केलाय मी...
खूप काम केल्यावर खूप भूक लागली. पण डब्ब्यातलं सलाड संपलेलं म्हणून "जाऊ दे, आजच्या दिवस खाते." म्हणून मस्त डबल चीज सँडविच मागवून खाल्लं.
घरी आल्यावर पण आईने मस्त आलू पराठे केलेले. आहाहा काय खमंग सुवास दरवळत होता. मी डाएटवर असल्याने फक्त 3च पराठे खाल्ले तेही लो फॅट बटर लावून. संकल्प केलाय न, मग फॅट फ्री गोष्टीच खायला हव्या न!
महिनाभर मी जबरदस्त डाएट केलं.
मध्ये फक्त एकदाच बटर चिकन इन लो फॅट बटर, शेव पुरी, शुगर फ्रीवाली रसमलाई, बासुंदी-पुरी, पावभाजी, पास्ता (पण चीज नाही हं, तसा आपला संकल्प आहे!) पनीर-चिली, गुलाबजाम, रसगुल्ला (पाक पिळून), दहीवडा, बटाटेवडा, राज कचोरी, सँडविच, चमचम, मम्मीच्या हातचा मैसूर पाक इतकंच खाल्लं. बाकी रोज नित्यनेमाने सलाड खायचेच, घरातून चालत रिक्षा स्टॅण्डपर्यंत जायचे, रोज लिंबू सरबत प्यायचे, एकदा मित्राच्या बड्डेला खाल्लेल्या चिकन बिर्याणी शिवाय भाताला तर हातही लावला नाही.
किती कडक डाएट केलं मी. महिन्याच्या शेवटी उत्सुकतेने मी वजन करायला काट्यावर उभी राहिले... अहो आश्चर्यम! वजन 2 किलो वाढलेलं!
काही कळेना... इतकं हार्ड डाएट करून वजन वाढलंच कसं??
नाही नाही, माझा संकल्प वाया जाऊ देणार नाही मी.

उद्यापासून मी डाएट करणार म्हणजे करणार. पण आत्ता
आईने बनवलेल्या पुरणपोळीच काय करू???
खाऊ की नको????
नाही तसा संकल्प आहे हा!
नाही तसा संकल्प आहे हा!
- अनिष्का
No comments:
Post a Comment