जागतिक महिला दिन विशेषांक

दिनांक ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. या निमित्ताने कट्ट्याचा पुढील म्हणजे मार्च महिन्याचा अंक हा जागतिक महिला दिन विशेषांक असणार आहे.

मागील वर्षीही या महिन्यात असाच विशेषांक काढून आपण आपापल्या क्षेत्रात अद्वितीय कर्तृत्व गाजवणाऱ्या काही महिलांची माहिती घेतली होती. यावेळी या अंकाचे स्वरूप थोडेसे वेगळे असणार आहे. 

१. स्त्रियांच्या उन्नतीसाठी ज्या पुरुषांनी खरोखर परिश्रम घेतले अशा काही पुरुषांची ओळख आपण या अंकात करून घेऊ उदाहरणार्थ महर्षी कर्वे 

२. स्त्री  आणि पुरुष ही जीवन रथाची दोन चाके. महिला सबलीकरणाने या रथाचा समतोल साधला जायला खरोखर मदत होत आहे काय ? - या विषयावर लेख चित्र  स्वत :चा रेकॉर्डेड व्हिडिओ किंवा ऑडिओ   या कोणत्याही माध्यमातून आपण आपले मत व्यक्त करू शकता.

३. शिक्षण आणि करिअरची संधी मिळालेल्या आपल्यासारख्या सुदैवी स्त्रियांची संख्या अजूनही सीमित आहे पण ज्यांना ही संधी उपलब्ध नाही अशांसाठी आपण काय करतो किंवा करू शकतो? -याही विषयावरची आपली मते वर सांगितलेल्या कोणत्याही माध्यमातून आमच्यापर्यंत  पोहोचवावित.


आपला उत्तम प्रतिसादच पुढील अंक नवीन पल्ला गाठू शकेल. दिनांक पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपले साहित्य आमच्याकडे पाठवा. धन्यवाद .


मित्रमंडळ कट्टा समिती 

No comments:

Post a Comment