आपण आहोत तिथेच असतो का?

आपण जेंव्हा एखादी गोष्ट पाहतो, ऐकतो, करतो तेंव्हा आपल्याला वाटते की आपण ती शरीराने करत असतो. आपली कर्मेंद्रिये ती करत आहेत. पण आपण जे काही काम करतो त्यात मनाचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो. प्रत्येक गोष्ट मनात पहिल्यांदा होते आणि मग कर्मेंद्रिये ती पार पाडत असतात. त्यामुळे मनाचा सहभाग असल्याशिवाय कुठलेच काम उत्तम होत नाही.
ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया पूज्य पेठे काकांच्या खालील लेखातून...

लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


पेठे काकांबद्दल 

डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली. त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळ, नाम शिबिरेप्रश्नोत्तरसत्रेपदयात्राहरिजागरआत्मपरीक्षण शिबिरेमुलांची शिबिरेचिंतनसत्रचर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ सीडींचे प्रकाशन झाले आहे.

No comments:

Post a Comment