जरी आपण या जगात आलोय
मातपित्या द्वारे, तरीही आहोत
पूर्णपणे वेगळे अन् स्वतंत्र!
एकटेच आलोय अन्
एकटेच जाणार
हेच फक्त सत्य!
कधी कधी सोडून द्यावं लागतं
आपल्या जिवलगांनाही
त्यांच्या दैवावर,
त्यांनीच निवडलेल्या
त्यांच्या प्राक्तनावर!
आपल्या उरी शल्य उरे
जन्मभराचे ...असहायतेचे
ते तर आपले प्राक्तन!
फक्त कर्तृत्वाची रेषा
हातावर पाहणाऱ्या 'मी' ला
लाचार,दुर्बल बनवणाऱ्या
अपराधीपणाला आज
दे तू तिलांजली
अन् घे मुक्त भरारी
मनाच्या अवकाशात....
बंधनांचे दुःख देणारे
बंध हलकेच सोडवून...!!
अवघड आहे पण अशक्य नाही !!!
मातपित्या द्वारे, तरीही आहोत
पूर्णपणे वेगळे अन् स्वतंत्र!
एकटेच आलोय अन्
एकटेच जाणार
हेच फक्त सत्य!
कधी कधी सोडून द्यावं लागतं
आपल्या जिवलगांनाही
त्यांच्या दैवावर,
त्यांनीच निवडलेल्या
त्यांच्या प्राक्तनावर!
आपल्या उरी शल्य उरे
जन्मभराचे ...असहायतेचे
ते तर आपले प्राक्तन!
फक्त कर्तृत्वाची रेषा
हातावर पाहणाऱ्या 'मी' ला
लाचार,दुर्बल बनवणाऱ्या
अपराधीपणाला आज
दे तू तिलांजली
अन् घे मुक्त भरारी
मनाच्या अवकाशात....
बंधनांचे दुःख देणारे
बंध हलकेच सोडवून...!!
अवघड आहे पण अशक्य नाही !!!
-------------------------------------------------------------
-स्मिता शेखर कोरडे
-स्मिता शेखर कोरडे
No comments:
Post a Comment