लहानपणी बाराखडी शिकताना आपण ओ म्हणजे ओझेवाला घोकलेले असेल. त्या बिचाऱ्याला चरितार्थासाठी ओझे वाहून दिवसभर राबत रहावे लागते. त्याने घाम गाळला तरच आमटी भाकरीची सोय होते. त्याच्या ओझे वाहण्याला कारुण्याची किनार आहे.
पण आपण वाहत असलेल्या काळजीत कुठेही अन्नपाण्याचा, मुलाबाळांचा, निवाऱ्याचा प्रश्न नाही. हलक्या मनाने, आनंदाने जगण्याची संधी असून सुद्धा ती अनावश्यक काळजीची ओझी आपण वाहून का दमतो याचा वेळीच विचार होणे गरजेची नाही का? ह्या ओझ्यांतून मुक्त होऊन जीवनाचा आनंद कसा घेता येईल याचा उहापोह डॉ. सुहास पेठेकाका यांच्या लेखात जरूर वाचा.
त्यांचा बिनगरजेची ओझी हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री. ज्ञानेश्वर माऊलीपासून ते श्री. जे कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथाच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकानी स्वेच्छयानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली. त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळ. नाम शिबिरे, प्रश्नोत्तरसत्रे, पदयात्रा, हरिजागर, आत्मपरीक्षण शिबिरे, मुलांची शिबिरे, चिंतनसत्र, चर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ सीडींचे प्रकाशन झाले आहे.
पण आपण वाहत असलेल्या काळजीत कुठेही अन्नपाण्याचा, मुलाबाळांचा, निवाऱ्याचा प्रश्न नाही. हलक्या मनाने, आनंदाने जगण्याची संधी असून सुद्धा ती अनावश्यक काळजीची ओझी आपण वाहून का दमतो याचा वेळीच विचार होणे गरजेची नाही का? ह्या ओझ्यांतून मुक्त होऊन जीवनाचा आनंद कसा घेता येईल याचा उहापोह डॉ. सुहास पेठेकाका यांच्या लेखात जरूर वाचा.
त्यांचा बिनगरजेची ओझी हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
पेठे काकांबद्दल
No comments:
Post a Comment