दिवाळी


आला सण भाग्य घेवोनिया
दारामध्ये सुखाची रांगोळी घालुनिया
आनंदाने पूजेचे तबक सजवूया
स्वागताची तयारी घरोघरी करूया

मनाचा कोपरा स्वच्छ करूया
नात्यामधली जळमटे साफ करूया
देहाचा देव्हारा स्वच्छ करूया
देव्हाऱ्यात नामाचा दिवा तेववूया

दिव्याने देह तेजोमय करूया
तिथे श्रीरामाला पुजूया
रामनामात एकरूप होवूया
देहाच्या घरात दिवाळी साजरी करूया


-- सौ. युगंधरा परब

No comments:

Post a Comment