जरी दाटली कधी काजळी
दुःख होऊनि अंत:करणी
मनात जागो आशा आपुल्या
सांगतसे ही अक्षय तृतीया ।।
क्षमाशीलता
मनी आणुया
द्वेष,
लालसा, हीन सोडुया
विवेक
ठेऊन तेज लेवूया
सांगतसे
ही अक्षय तृतीया ।।
दूरदूर संवाद चालती
घरांमधे पण विरती नाती
विरळ न होवो नात्यांमधली
'वीण'.. सांगते
अक्षय तृतीया।।
'मी',
'माझे' अन् 'माझ्यासाठी'
कोष असे
जो आपुल्याभवती
अलगद
त्यातुनी मुक्त होऊया
सांगतसे
ही अक्षय तृतीया।।
अक्षय राहो प्रेमभावना
अक्षय राहो मैत्र जाणिवा
माणुसकीचे झरे वाहुद्या
विनवणी करिते अक्षय तृतीया ।।
No comments:
Post a Comment