कधी कधी . . .



कधी कधी वाटतं चंद्रालाच गाठावं
कलेकलेने जगणं मी सुद्धा शिकावं

कधी कधी वाटतं सूर्याला बिलगावं
चांदण्यांच्या कुशीत मी त्याला निजवावं

कधी कधी वाटतं आकाशात हिंडावं 
फुलपाखरा संगे उंच उंच उडावं

कधीकधी वाटतं स्वप्नात जगावं
रोज नव्या कलेने स्वतःलाच भेटावं

                             स्वाती निरंजन


No comments:

Post a Comment