एके
दिवशी म्हणाला चांदोबा आपल्या आईला
शिवून
देग मला माझा लोकरीचा झबला ||
रात्रभर सतावतो वारा
अन वाजते मला थंडी
आकाशाची सफर करायची
पण भरते मला हुडहुडी
आजारी
पडतो मी सारखा, हवा न मानवे मला
शिवून
देग मला माझा लोकरीचा झबला ||१||
काय करावे, कसे करावे हे तिस नाही कळले
एके
दिवशी होसी छोटा अन एके दिवशी मोठा
सांग
कसा शिवू मी तुला लोकरीचा झबला ||२||
की शिऊ मी तुला पंधरा
लोकरीचे झबले?
ऐकून
चांदोबा झाला खुश, म्हणे चालेल आई
मला
शिवून
देग मला माझा लोकरीचा झबला ||३||
मंजिरी
विवेक सबनीस
No comments:
Post a Comment