हे सखे, तू स्वतंत्र नारी
तू सशक्त नारी
पैसा हे सर्वस्व नसे जरी
पैशावर दुनिया चाले सारी
पैशानेच मिळे साऱ्यांना सन्मान
पैशामुळेच ताठ रहाते तुझी मान
स्वतःची हिम्मत स्वतःची मेहनत
यातूनच करतेस तू तुझा गौरव
बोलण्यात तुझ्या सदा असे मार्दव
घाम गाळून तू माणसं जोडतेस
संसार रथाला उत्तम चालवताना
इतरांनाही मदत करतेस
मुलंबाळं पती सासर-माहेर
सारं सारं सांभाळतेस.....
तुझ्या प्रामाणिकतेचं तेज
तुझ्या देहबोलीतून धावतं
तुझ्या मेहनतीचं रक्त
समाजाच्या नसांनसांतून धावतं.....
तू ज्योत आहेस मुलांच्या मायेची
तू मशाल आहेस स्वाभिमानाची
सखे,हरू नकोस ,
कध्धी हताश होऊ नकोस
तुझ्याकडे पाहून मलाही हिंमत येते
स्व-बळावर उभं रहाण्याची किंमत कळते.....
उत्साह आनंदाची कर तू उधळंण
वाकड्या मार्गी चालणाऱ्यांना लाव तू वळण
तुझी आभा,तुझं स्वत्वाचं तेज
साऱ्यांना पुढची वाट दाखवो
अंधारलेल्या रस्त्यांना प्रकाशमान करो
सख्यांनो, मला तुमचा प्रत्येकीचा
खूप खूप अभिमान आहे
तुमच्या साठीच माझी
ही मानवंदना आहे !!
-- स्मिता शेखर कोरडे
No comments:
Post a Comment