फ्लोरेन्स नाइटिंगेल



१२ मे हा परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. एखादा दिवस जेव्हा विशेषत्वाने साजरा होतो तेव्हा त्यामागे कुणाची तरी तपश्चर्या असते. अगदी बरोबर तसेच फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या बाबत म्हणता येईल. १२ मे १८२० रोजी श्रीमंत अश्या इंग्लिश कुटुंबात जन्मलेल्या फ्लोरेन्सने आपले शाळा कॉलेजचे शिक्षण व्यवस्थित पुरे केले.

त्याग सेवा समर्पण हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. कुठलेहि काम निस्वार्थपणे फळाची अपेक्षा न करता त्याग वृत्तीने विरक्तपणे करावे हे आम्हाला आमच्या संतांनी वेळोवेळी सांगितले आहे.

अर्थात हे सत्य मर्यादित नसून वैश्विक आहे. त्या मुळेच त्याचा उदय कोणाच्याही हृदयात होऊ शकतो तसेच काहीसे फ्लोरेन्स यांच्या बाबतीत झाले.

१८५४ मधील झालेल्या युद्धात मदतीसाठी ब्रिटिश सरकार कडून तरुणांना आवाहन केले गेले. त्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची देखभाल करण्या साठी फ्लोरेन्सने जायचे मनोमन ठरवले.

ती आणि तिच्या सारख्या काही तरुण मुली आणि मुलांनी हे आवाहन स्वीकारले.

क्रिमियातील युद्धभूमीच्या ठिकाणी पोहचल्यावर जखमी सैनिकांची देखभाल सुरु झाली. फ्लोरेन्सच्या हे लक्षात आले कि बरेसचे सैनिक जखमांमध्ये जंतू दोष (इन्फेकशन आणि सेप्टीसेमिया) झाल्याने मरत होते. त्यावर तिने विचार केला की केवळ औषधे दिल्याने आणि ड्रेसिंग केल्याने जखमा बऱ्या होणार नाहीत तर त्या साठी रुग्णाच्या भोवतालची आणि रुग्णाची स्वच्छता तसीच निर्जंतुकीकरण (स्टर्लिझशन) महत्वाचे आहे.

या विचाराबरोबर फ्लोरेन्स झपाटून कामाला लागली. प्रथम तिने आपल्या बरोबर सेवेसाठी आलेल्या तरुण मित्र मैत्रिणींना या बद्दल सांगितले. काहींनी तिला साथ दिली, काहींनी नाही. पण ती डगमगली नाही. ज्या ठिकाणी जखमी सैनिकांना ठेवले होते त्या ठिकाणची स्वच्छता ती स्वतः करून घेऊ लागली. रुग्णाच्या स्वच्छते साठी येणाऱ्या साबण, कपडेनिर्जंतुक द्रव्य या मध्ये पळावा पळावी बरीच होते हे तिच्या लक्षात आल्यावर तिने त्या विरुद्ध आवाज उठवला. मानवी प्रवृत्ती सगळीकडे सारख्याच येणाऱ्या वस्तू औषधे कपडे वगैरेची यादी बनवायला सुरुवात केली. रोजच्या रोज रुग्णांना त्याचा होणार वापर आणि शिल्लक साठा यावर काटेकोर लक्ष ठेवले. रुग्णांच्या जखमां निर्जंतुक ड्रेससिंग मटेरियल वापरून स्वच्छ केल्या जातील या कडे तिने जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली त्याच बरोबर रुग्णाचा आहार मुख्यतः प्रोटेइन्स आणि व्हिटॅमिन्स युक्त असेल यावर भर दिला. 

रुग्णांसाठी येणाऱ्या औषधाचा साठा व्यवस्थित ठेऊन त्याची यादी बनवणे रोज खर्च केलेली औषधे, शिल्लक औषधे यांची नोंद ठवण्यास सुरुवात केली त्याच बरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट तिने केली म्हणजे प्रत्येक रुग्णाची होत असलेली प्रगती तिने लिहून ठेवायला सुरुवात केली रुग्णाची सुधारत चाललेली प्रकृती ही योग्य परिचर्येचे फळ आहे हे तिच्या लक्षात आले. त्या साठी ती स्वतः जातीने रात्रंदिवस काम करत असे.
रात्री सुद्धा हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाला झोप लागली आहे ना किंवा काही त्रास आहे या साठी ती स्वतः फिरत असे. त्या साठी तिला लेडी विथ लॅम्प असं म्हटले जाते.

अर्थातच तिच्या या काटेकोर परिचर्येमुळे अनेक सैनिकांना जीवन दान मिळाले. पुढे हे युद्ध संपले आणि फ्लोरेन्स आपल्या गावी परतली.

घरी परतल्यावर सुद्धा फ्लोरेन्स च्या मनातून युद्धातील सैनिकांबद्दलचे विचार चालू होते जणूकाही पुढे येणाऱ्या परिचर्या (नर्सिंग) व्यवसायाचे बीज तिच्या मनात रुजले होते. या विचारातूनच रुग्णांसाठी अभ्यास पूर्ण असे नर्सिंगचे शिक्षण सुरु करावे असे तिने ठरवले. त्यानुसार तिने काही मुलींना एकत्र करून शिकवायला सुरुवात केली ज्या मध्ये रुग्णाच्या मूलभूत गरजा ज्यात शारीरिक स्वच्छता नियमित औषधोपचार, आहार आणि मानसिक आधार देण्याचे तंत्र या विषयांवर भर देण्यात आला.

शरीर आणि मन एकमेकांशी निगडित असून शारीरिक स्वच्छता मानसिक प्रसन्नतेसाठी आणि मासिक आरोग्य शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असते.

भारतामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात आरोग्याचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात होते अनेक वर्ष पारतंत्र्यात पिचलेल्या आणि वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळ मुळे कुपोषण बालमृत्यू अर्भक मृत्यू माता मृत्यू यांचे प्रमाण जास्त होते. या शिवाय संसर्गजन्य आजारांचे प्रमाण हि जास्त होते. अश्यावेळी UNICEF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थे कडून भारतातील कुपोषण बालमृत्यू माता मृत्यूचे प्रमाण रोखण्या साठी मदत येऊ लागली.

याच काळात परिचारिकांना सुयोग्य शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली प्रथम हे शिक्षण डॉक्टर्स देत अस. अर्थात ते शिक्षण बऱ्याच प्रमाणात मर्यादित होते. काही काळ नंतर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. त्यांनी तर घोषणा केली कि केवळ व्यंग नसणे म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक मानासिक सामाजिक आणि अध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य.

या अनुषंगाने भारतीय सरकार कडून पंचवार्षिक योजनेत आरोग्य सेवेवर विशेष भर देण्यात आला. नर्सिंगच्या अभ्यासक्रमांमध्ये हॉस्पिटल नर्सिंग अँड पब्लिक हेअल्थ नर्सिंग या दोन प्रमुख विषयांचा सामावेश केला गेला. हा अभ्यासक्रम विजनानावर आधारित आणि एक कला म्हणून शिकवण्यात यावे असे ठरले त्या साठी दिल्ली मध्ये इंडियन नर्सिंग कौन्सिलची स्थापना झाली.

आणि नंतर राज्यामधून नर्सिंग कौन्सिल च्या शाखा सुरु करण्यात आल्या. इंडियन नर्सिंग कौन्सिलचे मुख्य काम म्हणजे नर्सिंगचा अभ्यासक्रम ठरवणे वेळोवेळी होणाऱ्या सामाजिक बदल आणि सरकारी धोरणांनुसार नर्सेस च्या अभ्यासक्रमात भर घालणे किंवा बदल करणे. परीक्षा पद्धती ठरवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे त्यानुसार परीक्षा घेणे इत्यादी.

आता भारत विकसनशील देश म्हणून ओळखला जातो यामध्ये इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि मेडिकल कौन्सिल यांचे योगदान खूप मोठे आहे अर्थात या मध्ये गाव पातळीवर काम करणाऱ्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या नर्सेस चा विशेष वाटा फार मोलाचा आहे, त्यामुळेच आता नर्सिंग म्हणजे केवळ सेवा एवढेच नसून नर्सिग ला व्यवसायाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

अनेक सरकारी निमसरकारी तर खाजगी रुग्णालयात नर्सिंग कोर्सेस सुरु आहेत. त्यांना इंडियन नर्सिंग कौन्सिलची मान्यता असावी लागते सध्या सरकारी धोरणानुसार बारावी नंतर जनरल नर्सिंग अँड मिडविफरी किंवा बारावी सायन्स नंतर बी स सीनर्सिंग ची पदवी घेता येते. या शिवाय उच्चशिक्षण म्हणजे पदव्यूत्तर नर्सिंग आणि डॉक्टरेट करता येते. या शिवाय काही विशेष कौर्सेस जसे कार्डियाक केअर नर्सिंग, पब्लिक हेल्थ नर्सिंगपेडिऍट्रिक आणि सायकॅट्रिक नर्सिंग करता येते.

नर्सिंग व्यवसायाला आता समाज मान्यता प्राप्त झाली आहे केवळ परित्यक्ता किंवा विधवा नव्हे तर अनेक मुली या व्यवसायात आपले योगदान देत आहेत.

Take up one idea. Make that one idea your life - think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves, every part of your body, be full of that idea, and just leave every other idea alone. This is the way to success.-

असे स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे त्याचे मूर्तिमंत उदाहरण या नर्सिंग व्यवसायाच्या पहिल्या नर्स फ्लॉरेन्स नाईटिंगेल. त्यांना मानाचा मुजरा.

                           सुप्रितम गोटखिंडीकर 



No comments:

Post a Comment