लाटे भवती स्वप्नांची लाट
किनारी वाहे सोनेरी पहाट
त्या पहाटेच्या भोवताली
आरास किरणांनी मांडयली
अन् तारीले तुझ्याच अंतरी
मी माझे स्वप्नही
किनारी वाहे सोनेरी पहाट
त्या पहाटेच्या भोवताली
आरास किरणांनी मांडयली
अन् तारीले तुझ्याच अंतरी
मी माझे स्वप्नही
वाटे भावती स्वप्नांची साथ
वळणि भेटे पुनवेचि रात
त्या पुनवेच्या भोवताली
आरास तारकांनी मांडयली
अन् कोरले तुझ्याच नयनी
मी माझे स्वप्नही
पुष्पांभवति काट्यांचे रान
गंधात विजयी स्वप्नांची पान
त्या पानांच्या भोवताली
आरास पाखरांनी मांडिली
अन् ओवले तुझ्याच ह्रदयि
मी माझे स्वप्नही
स्वप्ना भवती स्वप्नांची रांग
कसे निजू सख्या तूच सांग
त्या स्वप्नांच्या भोवताली
आरास भावनांनी मांडयली
अन् पाहताच तुझ्या नयनी
निजले स्वप्नही
वळणि भेटे पुनवेचि रात
त्या पुनवेच्या भोवताली
आरास तारकांनी मांडयली
अन् कोरले तुझ्याच नयनी
मी माझे स्वप्नही
पुष्पांभवति काट्यांचे रान
गंधात विजयी स्वप्नांची पान
त्या पानांच्या भोवताली
आरास पाखरांनी मांडिली
अन् ओवले तुझ्याच ह्रदयि
मी माझे स्वप्नही
स्वप्ना भवती स्वप्नांची रांग
कसे निजू सख्या तूच सांग
त्या स्वप्नांच्या भोवताली
आरास भावनांनी मांडयली
अन् पाहताच तुझ्या नयनी
निजले स्वप्नही
-स्वाती ब्रह्मे
No comments:
Post a Comment