सोसलेल्या घावांना


सोसलेल्या घावांना,
उत्तर द्यायचे आहे,
बळ एकवटून मग,
टक्कर द्यायची आहे...

संघर्ष जरी संपेना,
आत्मविश्वास ढळेना,
कर्म करत जगायला,
सकारात्मकताच आहे...

हे कळेना त्या संकटांना,
येताना गर्दी करतात,
अतिथी देवो भव,
हाच संस्कार कोरला आहे...

सुखाच्या मागे धावावे,
हे नकोच ना आता,
आहे त्यात सुख मानायला,
मनाची तयारी आहे...

कोणी म्हणेल हरले राव,
पण कसे सांगावे त्यांना,
शांत, समाधानी जगण्यात,
काय सुख दडले आहे... 

आरुशी दाते



No comments:

Post a Comment