ध्वजा फडकली
आभाळी ध्वजा फडकली
शुभ्र ललाटी भाग्य रेखित ध्वजा
फडकली।।
गर्भातून तेज:पुंज,
चेतवितो जीव समंध।
उत्तिष्ठत जागृत हो
उदेला बघ आसमंत!
कोटीकोटी नयन तेथून तुला न्याहाळती, (पहा)।
शुभ्र ललाटी भाग्य रेखित ध्वजा
फडकली - ।१।
(बस) एकांती हो समर्थ
दुनिया करी पादाक्रान्त।
घेई झेप विश्वसूनि सकल मंडली।
शुभ्र ललाटी भाग्य रेखित ध्वजा
फडकली - ।२।
तू किरण एक प्राचीचा
दिनकराच्या प्रीतीचा
झाकाळूनी माया, स्वयें हृदये
झळाळवी।
No comments:
Post a Comment