जीवनदान - युगंधरा परब


उन्हाने ग्रीष्माच्या तापली धरा
चिंब चिंब व्हावयाची वाट बघते
आसावली धरा आता वर निळ्या आभाळाला 
अगा करुणेची साद घालते

हाकेला धरेच्या घालीत साद
बेहोश बेधुंद पाऊस येतो
वाजत गाजत आपुल्या येण्याची
धुंदीत गंधित चाहुल देतो

तृप्त झाली धरा आता
अंगभर मखमल लेवून घेते
डोंगर-दरीत कडेकपारीत 
दुधाळले रसपान चालते

सोनेरी किरण पिऊन धरा
नव्या अंकुराची चाहुल घेते
नाजुक हळव्या हातांनी अपुल्या
जीवनाचे दान देऊन जाते


--- युगंधरा परब





No comments:

Post a Comment