Status आणि Update



हातात सहज फोन घेतला, तर एका माजी सहकाऱ्याचंस्टेटस अपडेट दिसलं. तिने तिचा फॅमिली फोटो लावला होता, तो पाहून सहजच तिला विचारलं, कीह्या तुझ्या आई नि बहिणी आहेत का गं?’ तिनेहोनि पुढे thanks for asking म्हटलं... पहिल्यांदासामान्य पद्धतम्हणून मी दुर्लक्ष केलं, पण नंतर डोक्यातून तिचं ‘thanks for asking’ काही जाईना... वाटत होतं की, there’s lot more to it... 

हे दाखवायचे फोटो (dp), status, ह्यातून आपल्याला दरवेळी रिस्पॉन्स अपेक्षित असतोच असं काही नाही ना! पण मग उगाचच public display का बरं करत रहातो आपण... आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या updates आपण संबंधितांशी इतर प्रकारे share करतोच की! पण मग इकडे गेले, हे खाल्लं, मी अशी hairstyle केली, ह्यांना भेटले, असा जगभर बोभाटा कशाला लागतो बरं आपल्याला?

किंवा त्याचं असं झालंय, की लोकांपर्यंत आपण पोहोचणं सोपं झालंय, पण त्यामुळे माणसं जवळ आलीयेत का, आपली नि आपल्या सुह्रदांमधली अंतरं खरंच संपलीयेत का, हा विचार करण्याचा मुद्दा झालाय... काय आहे, पोहोचण्याची एवढी सोप्पी माध्यमं असूनसुद्धा त्यावरसुद्धा लोकं प्रतिक्रिया देत नाहीत!
त्यामुळेच अचानक कुणी प्रतिक्रिया दिली तरीही विशेष वाटू लागलंय सध्या!
त्यावरून आठवलं, परवा भाऊबीजेला एका मैत्रिणीने फेसबुकवर status post केली होती, की 'आज सारी दुनिया भाऊबीज साजरा करतीये, पण मी मात्र माझ्या भावांची इथे एकटी बसून आठवण काढते आहे!' वाचून खरंच वाईट वाटलेलं मला, पण मी तरी काय करणार होते, वाचून गप्प राहीले. संध्याकाळी ती डोळ्यांत पाणी आणून सांगत होती, की दिवसभरात ते वाचून फक्त एका भावाने फोन केलान, नि एकाने मेसेज केला. बाकी सर्व सामसूम...

बस्स एक सेकंड की दूरी पे  राहूनसुद्धा कुणाला कधी, किती, आणि मुळात वेळ द्यायचा की नाही, हा निर्णय ह्या यंत्रांच्या पालकांकडेच असतो! बरं, हे वाचून जे विचारायला येतात, ते ही नेमके आपल्याला अपेक्षित गण असतील असं नाही! परवाच एका पार्टीमध्ये एका बाईची सगळ्या चेष्टा करत होत्या. ती आमच्यातल्या एकीची बहीण. काही दिवसांसाठी इथे बहिणीकडे राहायला आलेली, त्यामुळे बरेच जणींशी ओळख झालेली तिची! तर त्याला आता काही वर्षे झालीत, तरीपण सगळ्यांच्या statusवर ही खोदून खोदून प्रश्न करत राहाते! कुठे गेलेलात, किती जण होते, काय menu होता वगैरे... इतका पिच्छा पुरवायची की म्हणे पुढच्यावेळी status ठेवताना, 'visible to all except one' असं करूयात अशी बोलणी चाललेली! बापरे! एकूण problem काय... जुनाच आहे!
ज्यांच्यापर्यंत पोहोचायचंय, त्यांच्यापर्यंत काही केल्या मेसेज जात नाहीये (मग ते समजून घेत नसतील, किंवा वाचतही नसतील); आणि ज्यांच्यापर्यंत मेसेज पोचतोय, त्यांना तो मिळाल्यामुळे आपल्याला काही फारसा उपयोग होणार नाहीये!
ओह! म्हणजे प्रवासच विनाकारण खूप मोठा झाला तर! संवादाचं status अजूनही पूर्वी होतं तिथेच!!

प्रज्ञा वझे



No comments:

Post a Comment