नयनरम्य बाली

बालीला जायचं ठरवलं तेव्हा मनामध्ये प्रचंड उत्सुकता होती, कारण बालीबद्दल थोडंफार ऐकलं होतं. हिंदू संस्कृती जोपासणारं एक राष्ट्र, सुंदर सागरी किनारे, ज्वालामुखीचे पर्वत इत्यादी. बालीच्या देनपसार इथल्या Ngurah Rai विमानतळावर पाय ठेवताच हे सगळं जाणवलं. समोर दिसला तो भव्य गणपतीचा पुतळा.
इमिग्रेशनच्या लाईनमध्ये उभे असताना तिथल्या कर्मचाऱ्याचे हात जोडून अदबीने बोलणं...आणि पुढे १ आठवड्याच्या मुक्कामात त्याची प्रचिती येत गेली.
बाली दर्शनासाठी जुलै ते ऑक्टोबर हा चांगला सिझन आहे. याच काळात युरोपचीन, अमेरिकाजपानऑस्ट्रेलियाइत्यादी देशविदेशातून पर्यटक आलेले असतात. हॉटेल्सचे दर बऱ्यापैकी जास्त असताततरी तेव्हा जायचंकारण बाली सर्वांगाने नटलेली असते. स्वच्छ समुद्रकिनारेभातशेतीची हिरवाईफुललेल्या बाजारपेठाकलाकुसरीची दालनंइत्यादी बाली लोकांचं अगत्य या सगळ्यात आपण हरवून जातो.

आम्ही फिरलो तो भाग म्हणजे दक्षिण मध्य उबूड  (Ubud ) आणि
दक्षिण किनारा जिमबारन (Jimbaran) इंडोनेशियातील बाली बेटावर ९०% लोक हिंदू आहेत,  तर हजारापेक्षा जास्त मंदिरं आहेत. आंबाफणसनारळ आणि सर्वत्र चाफाजास्वंदकण्हेर बघितल्यावर तर कोकणात फिरत असल्यासारखं वाटत होतं.  रस्ते अरुंद पण स्वच्छ! कुठेही हॉर्नचा आवाज नाही. सगळं शिस्तीत! माणसं विनम्र आणि हसतमुख.

बालीमध्ये बहासा इंडोनेशियाइंग्लिश मलाया व बाली भाषा बोलली जाते.  बरेचसे शब्द संस्कृतोद्भव असल्यामुळे मराठीशी साधर्म्य जाणवलं. Ladies साठी 'वनिताहा शब्द! उबुड (Ubud ) इथल्या Villa ची Care taker एक 'वनिता'च होती अशीच हसतमुख.   
बाली हा माकडांचा राजा म्हणून की कायइथेही खूप माकडं आहेत. Monkey Forest  पाहताना चांगलीच भंबेरी उडते. इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या जिवंत ज्वालामुखीपैकी एक "माऊंट बाटुर" (Mount Batur) बालीमध्ये आहे. या डोंगरातून वाफा आणि क्वचित ज्वाला निघताना दिसतात. हा १७०० मीटर उंचीचा १२ किलोमीटरचा ट्रेक आमच्या टूरचा कळस ठरला! Batur Lake नावाचं तळं याच ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलं आहे. जिमबारन (Jimbaran) ला बीच वर Sea Walk केला तो दुसरा अविस्मरणीय दिवस! तेथेच Turtle Island वर कासव आणि काही इतर जलचर पाहिले.


बालीमध्ये अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराला एक पौराणिक वास्तुकला म्हणून एक वेगळं स्थान आहे. इथल्या लोकांचं धार्मिक, सामाजिक कार्य याच मंदिराच्या भव्य दालनामध्ये होत असते. Tanah Lot आणि Uluwatu Temple तर सूर्यास्ताच्या वेळेस बघण्यात विशेष मौज आहे. उलून दानू (Ulun Danu) मंदिर Beratan तलावावर आहे.
GVK सेन्टर ला गरुड आणि विष्णूचा प्रचंड उंच पुतळा आहे. Tirt Holy Water Temple म्हणजे आपल्या देवस्थानातील कुंडाप्रमाणे कुंड आहे, आपल्यासारखेसच भाविक तेथे स्नान करून तीर्थ बाटलीमध्ये भरून नेत होते. मंदिरातील अवाढव्य परिसरात आपल्याला Sarong घालून फिरता येतं. Sarong म्हणजे आपल्याकडील लुंगीसारखंच. हनुमानगणेश देवतांच्या मूर्ती तर नकुलसहदेवअर्जुनकुंती यांचे पुतळे दिसले. रामायण महाभारतातील कथाही संगीत नाट्य रूपाने सादर केल्या जातात. असाच आम्ही एक किचक डान्स आणि Borang डान्स पाहिला.
Borang हा मायथॉलॉजिकल Animal प्रत्येक घराच्या प्रवेशद्वारात असतो जो
घरामध्ये फक्त सकारात्मक उर्जेला प्रवेश देतोअसा त्यांचा विश्वास आहे.
एकीकडे Borang तर एकीकडे गणेशाची मूर्ती असते. घराभोवतीच्या भिंती

अत्यंत सुशोभित दिसत होत्या. प्रवेशद्वारातच घरातलं मंदिर असतं.
इथे रोज पंचमहाभूतांची पूजा केली जाते. छोट्या छोट्या बांबूच्या पानाचे द्रोणत्यात पूजेचं सामानतांदूळ आणि प्रसाद हे एकेक करून अंगणातपाण्याच्या ठिकाणीगॅस/शेगडीवरझाडावर ठेवलं जातं. ही पंचमहाभूतांची पूजा. आणि देव म्हणजे ब्रम्हाविष्णूमहेश नि गणपती. इंडोनेशियात वारंवार होणारे भूकंप आपण ऐकतो. इथे जी माणसं प्रत्यक्ष राहतात ती धरणीमातेला मनोभावे पुजत असणार यात शंकाच नाही. स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेऊन निसर्गाशी कृतज्ञ रहाणं, पर्यटक हेच मायबाप समजून त्याचं स्वागत मनोरंजनगायनवादनचित्रकलाकारागिरी इत्यादी माध्यमातून करणं… किती म्हणून सांगू. रस्त्यावर दगडांची रचनाही कलात्मक किंवा फूटपाथवर चेम्बरची झाकणंसुद्धा सुंदर डिझाईन पेंट केलेली. तो सगळा परिसर डोळ्यासमोर उभा राहतो. हे सगळं आम्ही सहा जण मनसोक्त उपभोगत होतो.

समवयस्कसमविचारी ग्रुपमुळे ट्रीपची मजा आली. मी तर ती हिंदी महासागराची अथांगताहिरवाई आणि फुललेला विविधरंगी चाफा आणि बाली संगीताचा ऱ्हिदम यातच हरवून गेले होते. मग मला आठवलं ध्यान म्हणजे काय हे सांगताना जे कृष्णमूर्ती म्हणतात, "निसर्ग निरीक्षणाने अवाक होणे हेही ध्यानच होय."

                           उल्का कुलकर्णी






No comments:

Post a Comment