नुकतंच ज्येष्ठ
भावगीत गायक अरुण दाते यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. अरुण दाते यांच्या जाण्याने ‘शुक्रतारा निखळला’ असंच प्रत्येकाच्या तोंडून निघालं.
मराठी भावगीतांच्या विश्वामध्ये अरुण दाते यांनी गायलेलं हे व इतर अनेक भावगीत म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारी. ‘आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पाहा….’, असं म्हणत अरुण दाते यांचे सूर जेव्हा आपल्या कानांवर पडतात तेव्हा आपल्या आयुष्यातील ‘त्या’ खास व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसोर येतोच.
मराठी भावगीतांच्या विश्वामध्ये अरुण दाते यांनी गायलेलं हे व इतर अनेक भावगीत म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारी. ‘आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पाहा….’, असं म्हणत अरुण दाते यांचे सूर जेव्हा आपल्या कानांवर पडतात तेव्हा आपल्या आयुष्यातील ‘त्या’ खास व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसोर येतोच.
४ मे १९३४ ला
जन्मलेल्या या गायकाने ६ मे २०१८ ला अखेरचा श्वास घेतला. या दोन तारखांच्या मध्ये म्हणजेच ५ मे रोजीसुद्धा एक खास योग जुळून आला होता.
तो म्हणजे, या दिवशी यंदाच्या वर्षी शुक्रतारा या
गाण्याला ५६ वर्षे पूर्ण झाली. तारखांचा योगायोग म्हणावा की एखाद्या कलाकाराची त्याच्या कलेप्रती, कलाकृतीप्रती असणारी
निष्ठा याचं उत्तर कोणाकडेच नाही.
१९६२ मध्ये शुक्रतारा
मंदवारा ह्या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक श्रीनिवास
खळेत्यांना आग्रह करीत. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने आपले
मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले
आणि अफाट गाजले. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही ‘शुक्र तारा’ गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत
त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले इ.स.
२०१० पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणाऱ्या मराठी भावगीतगायनाचे २५०० हून अधिक कार्यक्रम झाले. त्यांचे उर्दूतील आणि
मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. मंगेश
पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने
मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हणले जाते.
अरुण दाते यांनी लता
मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा
पागधरे यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. अशा या मराठी कलाविश्वातील अजरामर
शुक्रताऱ्याला कट्टयातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
- मित्रमंडळ कट्टा समिती
No comments:
Post a Comment