' पुंडलीक वरदा हरी विठ्ठल ' आसमंतात गुंजला,
आषाढ़ी एकादशीस विठू भेटीस् दिसे सोहळा आगळा।
पुंडलीकासाठी रखूमाई संगे विटेवर हा ठाकला,
कंबरेवरी हात ठेऊनी उभा हा विठू माझा सावळा।
नामा म्हणे उरकूनी संसाराचा पसारा हा सगळा,
सुटले सगळे पाश आता मी श्वास घ्यावयास मोकळा।
नसे क्षुद्र शिंपी, नको जातीवाद, तो ब्राम्हणी सोहळा,
देवा ठेव पायरीवरी तुझ्या चरणी देह माझा कोवळा।
निघाला जप करीत वारीत हा अनोखा भक्त विठ्ठला,
आपल्याच मस्तीत एकतारा घेऊनी लावूनी माथी टिळा।
पुंडलीक-नामा सारखा होवूनी गेला भक्त जगा वेगळा,
भटजी जपे माळ, तिकडे दान केलेल्या पैश्यावरी डोळा।
श्वेतांबर वेशभूषा बघूनी वाटे जनास हा बहूत सोवळा,
बकध्यान पांघरूनी एका पायावरी उभा ठाके बगळा।
-----------------------------------------------------------------------
डॅा नम्रता कुलकर्णी
डॅा नम्रता कुलकर्णी
No comments:
Post a Comment