शब्द ओळखा:
सूचना:
१) जेवढ्या रेघा आहेत, तेवढ्या अक्षरी शब्द आहे.
२) प्रत्येक शब्दातले एक अक्षर "झ" च्या बाराखडीपैकी एक आहे
_______________________________________________
१) केशवसुतांची एक कविता: झपुर्झा
२) छताला टांगलेले बिलोरी झाड: झुंबर
३) अस्वस्थ असलेला माणूस या घालतो: येरझार्या
४) हार के जीतनेवालेको कहते है: बाझीगर
( हिंदी सिनेमा)
५) मिरचीच्या ठेचाचे विशेषण: झणझणीत
६) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार: अझरुद्दीन
७) .... ..... रे भ्रमरा: रुणुझुणु
८) गणपतीची आरास करताना ह्या लावतात:झिळमिळ्या
९) भारतातील एक अभयारण्य: काझीरंगा
१०) शेअर बाजारात ही होते: पडझड
११) भारताचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज: झहीर खान
१२) गर्दी: झुंबड
१३) पहाटेचे विशेषण (चारही अक्षरात उकार): झुंजुमुंजु
१४) .... आला पहाटवारा: झुळुझुळु
(लतादीदींनी गायलेल्या
गाण्यातील शब्द)
१५) चांगल्या कलाकृतीचे विशेषण : झकास
No comments:
Post a Comment