सदर- साडीबद्दल बरेच काही (भाग 3) - बनारसी

बनारसी साड्यांच्या माहिती पूर्वी थोडे बनारस या शहराबद्दल जाणून घेऊयाबनारसकाशीवाराणसी तीन तीन नाव असलेले शहरसाड्यांच्या उत्पादनात भारतातील सर्वात प्रसिद्ध 
शहर...जगातील सर्वात  प्राचीन शहरांपैकी एक शहर म्हणून पण ओळखले जातेकाशीची संस्कृती ह्या संस्कृतीला अतिशय परिपोषक ठरली आहे जिला आपण आपली भारतीय 
संस्कृती म्हणतो. ज्या संस्कृतीला अस्तित्वात यायला अनेक मतमतांतरअनेक विचारधाराह्यांचा सहयोग लाभला आहे एवढेच नव्हे तर धर्मशिक्षा आणि व्यापार ह्यांचा काशीशी घनिष्ट संबंध असल्याने ह्या नगरीचा इतिहास हा केवळ राजनैतिक  होता एक अशा 
संस्कृतीचा इतिहास आहे ज्यामध्ये भारतीयतेचे पूर्णता अस्तित्व आपणास जाणवते.


ह्याच संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे भारतीय स्त्रियांचा पोशाख- साडी. साड्यांच्या अनेक प्रकारांपैकी जगभर सर्वांत सुप्रसिद्ध प्रकाराबद्दल लिहायचे झाले तर सर्वप्रथम बनारसी साड्याच येतात. ह्या साडी प्रकाराचा इतिहास तसे बघता फार जुना आहे; मुगल साम्राज्याच्या आधीपासून ह्या साड्यांचा उल्लेख इतिहासात आढळतो. मुघल साम्राज्यात ह्या साडीला खरी ओळख मिळाली. ह्या काळात 'वीव्हिंग' आणि 'स्पिनिंग' च्या क्षेत्रात प्रगती होत होती ही बाब फार उल्लेखनीय आहे. ह्याच काळात भारतातून माल परदेशात निर्यात होण्यास सुरुवात झाली आणि जागतिक बाजारपेठेत बनारस या शहराची महत्त्वाची भूमिका सुरू झाली. त्या काळी 'प्लेन डाईड' (Dyed) आणि 'प्रिंटेड' कापडाची निर्यात जास्त होत असे. जरी या बाजारपेठेची सुरुवात इंग्रजांनी किंवामुघलांनी केली असली तरी स्वातंत्र्यानंतरही व्यापार चालूच आहे, किंबहुना वाढतोच आहे.


बनारस हे शहर जरी उत्तर प्रदेशात येत असले तरी इतर प्रांतांतूनसुद्धा विणकर येथे येऊन स्थायिक झालेले आहेत. ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कलेला मिळणार वाव व भाव. दळणवळणाचा सोपा मार्ग, हातमागासाठी लागणारे सूत व धागे ह्यांची सहज उपलब्धता आणि इतर वस्तू व योग्य कच्चा माल मिळण्या सुलभता, ह्या सर्व बाबींमुळे विणकाराला व्यापार करण्यास बरीच मदत होते.

आता थोडे वळू या बनारसी साड्यांच्या प्रकाराकडे, १- कतान सिल्क २- ऑरगन्झा जरी आणि सिल्क ३- जॉर्जेट ४- क्रेप आणि कटवर्क.
            
कॉटन वापरून जिओमॅट्रिकल पॅटर्नचे गेथुआ (मल्टिहेडेड लूम) हा बनारसी साड्यांच्या डिझाईनचा सर्वांत सुंदर प्रकार आहे, ह्या प्रकारात टिश्यूच्या कपड्यावर धातू, सोने आणि चांदी यांचे यार्न वापरून विणकर सुंदर डिझाईन विणतो. मुघलांच्या काळात कॉटन आणि कॉटन-सिल्क एकत्र करून वापरले जायचे. त्या डिझाईनला 'अदा बेल आमरासी' म्हणून ओळखले जायचे. ह्यातही निरनिराळे प्रकार आहेत जसे 

वेफ्ट पॅटर्न इन फाईन काउंट / कॉटन सिल्क
सुती बेलादार बुट्टा पल्ला साडी / कॉटन वाईन बॉर्डर साडी/ बिग मोटिफ एन्ड पीस साडी  
                                                                                               
नामावली / अप्पर रीलिजस ड्रेप साडी 

गेथुआ-अदा बेल आमरासी / डायगोनल मल्टीहेडेड वोवन साडी 

वाराणासी वेफ्ट पॅटर्न 
अदा बुटीदार बालुचार नक्षा जाला साडी / डायगोनल मोटिफ ड्रॉ लूम वोवन साडी 

फेकवान दोरुखा मोतीचूर तंचोई साडी 

ड्रॉ लूम एम्ब्रॉयडर्ड एलिफण्ट बॉर्डर साडी 


 -- स्वाती ब्रम्हे

No comments:

Post a Comment