आला ग सुगंध मातीचा - सुजाता अय्यर

Click on orange play button ➤ to listen song



दारी पाऊस पडती , रानी पारवा भिजती
आला आला ग, सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती
आला आला ग, सुगंध मातीचा

श्रावणात सारे जीव झाले बाई ओले
ऊन हळदीचे पानापानातुन खेळे
उभी पिके हिंडोलती, बाळे झाडांची बोलती
आला आला ग, सुगंध मातीचा

वसुंधरा आज नवरसात बुडाली
माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली
श्रियाळराजाचा सण चांगुणा मातेचा
नागपंचमीचा देव तो ग शोभला

कुणी गौरी ग पुजिती, गोफ रेशमी विणती
आला आला ग, सुगंध मातीचा

गीत: अशोकजी परांजपे
संगीत: अशोक पत्की
स्वर: सुमन कल्याणपूर
कट्ट्यासाठी गायन :सुजाता अय्यर


No comments:

Post a Comment