संकल्प विशेषांक

आपण सर्वांनी लेख स्पर्धेला दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर मित्रमंडळ कट्टा एक अभिनव उपक्रम घेऊन येत आहे. या वेळच्या नूतन वर्षाच्या म्हणजे जानेवारी २०१८ च्या अंकांमध्ये आपण एक वेगळाच विषय हाताळणार आहोत.

नवीन वर्ष म्हणजे संकल्प. आपल्यापैकी बरेच जण दरवर्षी काहीना काही संकल्प करतात. काही पूर्ण होतात, काही सुरुवात होऊन अधुरेच राहतात तर काही मनातच राहून जातात. तर आपण केलेल्या यशस्वी किंवा अयशस्वी, गमतीदार किंवा गंभीर संकल्पाबद्दल या अंकात व्यक्त होऊ या. हा संकल्प तुमचा स्वतःचाच असला पाहिजे असंही नाही आपणास ठाऊक असलेली संकल्पाबद्दल ची एखादी कथा, एखादा अनुभव सुद्धा आपण शेअर करू शकता
किंवा असे संकल्प करावेत  कि करावेत, केल्यास कसे पूर्ण करावेत याविषयी सुद्धा मत व्यक्त करू शकता

आपले विचार आमच्याकडे लेख, रेकॉर्ड केलेली ऑडिओ फाइल, व्हिडीओ फाईल किंवा एखाद चित्र अशा कुठल्याही माध्यमातून आपण पाठवू शकता. ही स्पर्धा नाही. हे आहे तुम्हा आम्हा सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक माध्यम. आमच्याकडे आलेल्या जास्तीत जास्त कलाकृती प्रसिद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला तर, आपले विचार/अनुभव आमच्याकडे पंधरा डिसेंबरच्या आत पोहोचतिल या पद्धतीनं खालील पत्त्यावर मेल करा -mitramandalkatta@gmail.com


आपल्या विविधरंगी आणि भरघोस प्रतिसादाच्या प्रतीक्षेत, कट्टा समिती. 

No comments:

Post a Comment