दिवाळी


लागली दीपज्योतींची आवली दारो दारी,
झाली नांदी दीपावलीची, आली घरो घरी।

भल्या पहाटे सडा सावरण करता करता,
नक्षीदार शालू सम रांगोळी काढूया आता।

आंगणी मातीत बनवू किल्ले शिवरायांचे,
फडकावू त्यावर ध्वज मग ते स्वातंत्र्याचे।

लाल-हिरव्या-निळ्या छटा मिरवत अनेक, 
लुकलुकतो आकाश कंदील दारावर एक।

साथ देण्यास् त्या दिव्य ज्योतींच्या आवली,
मिचकत लटकती रंगीत दिव्यांच्या ओळी।

वसुबारस, नरक चतुर्दशी, भाऊबीज, पाडवा,
हर्षोल्लासाने साजरा करूया सण हा बरवा।

आली लक्ष्मी घेऊनी सुख समृद्धि दारोदारी,
पूजन तीचे करू नेसून नवीन लुगडं भरजरी।

चकल्या, शंकरपाळे, चिवडा, लाडूचा फराळ,
फटाक्यांच्या नांदीत आली दिवाळीची सकाळ।


✴🌠☀✨🌟❇

-- डॅा नम्रता कुलकर्णी

No comments:

Post a Comment