लेख स्पर्धा: चतुर्थ क्रमांक

माझा स्वयंपाक घरातील अविस्मरणीय अनुभव

मी तसा जात्याच खादाड! पण माझी खादाडी कोकणस्थीपणा कडे झुकणारी - जरा चिकित्सक. लहानपणी आईने माझा 'जरा चव सांग रे याचीअसा उपयोग करून घेऊन जीभ जरा जास्तच sensitive बनवलेली. त्यातून मी 'सर्वहारीमाणूस. खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीत - "चवीत बसलं पाहिजेहा एवढाच निकष - सामिषनिरामिष असा भेदभाव नाही. आवडलं तर त्याचे घटक शोधायचे आणि recipe मिळवायची - आणि  करून बघायची हा छंद. साधारणपणे ८वीत असेनतेंव्हा पासून स्वयंपाकघरात लुडबुड करायला लागलो आणि हट्ट करून आईकडून उपमा करायला शिकलो. हा माझा आवडता पदार्थमाझी आई सुरेख करायचीअजूनही करते - आणि मीही स्वतः मीच केलेल्या उपम्याचं हक्काचं गिऱ्हाईक आहे.

मोठा होत गेलो तसतशी चव आणखीनच तेज होत गेली;  ​नोकरीधंद्याच्या निमित्ताने चार गावंदोन पाच देश फिरलोतिथले पदार्थ खाल्ले आणि स्वयंपाकघरातले प्रयोगही वाढले. स्वयंपाक करणे हे एक उत्तम stress buster  आहे याचा साक्षात्कार झाला. सुदैवाने बायकोही चवप्रिय निघालीतिला माझ्या स्वयंपाकाच्या प्रयोगाबद्दल आक्षेप नसतो . तिचा राग फक्त माझ्या स्वयंपाकावरच राहिला - म्हणजे - मी किचनमधून बाहेर पडल्यावर तिला कराव्या लागणाऱ्या आवरासावरीपुरताच तिचा राग मर्यादित राहिला आहे.  पण "या बाबतीत आपले कधीच जुळणार नाही" हा तह आम्ही आमच्या लग्नाच्या लहानपणीच केला - (म्हणजे तहांचं पांढरं निशाण मी दाखवलं).

या प्रयोगांचा फायदा हा कि माझ्या स्वतःच्या म्हणून दोन पाच recipes माझ्याकडे आहेत. एका हितशत्रूने (चझ्यामा चयकोचीबा चहिणब) - "तू  तुझ्या recipes या-आणि-या  पाककृती पुस्तकातून उचलल्या आहेत " असा आरोप नंतर केला. पण त्या मी independently आणि कष्टाने तयार केल्या आहेत हे तितकेच खरे. मनापासून लक्ष दिले तर बहुतांश पदार्थ उत्तमच होतात हा माझा तरी अनुभव आहे. आणि आपल्याला हवी ती चव पहिल्या फटक्यात येत नाहीहे सुध्दा!! काहीतरी राहून जातं - मग तो पदार्थ परत एकदा तितक्याच काळजीने करून बघावा लागतो. असं दोन तीन वेळा ट्राय केला कि मग त्यावर हात बसतो - मग त्यानंतर मज्जाच.

मित्रांच्या बायका आणि त्यांच्या (म्ह.: मित्रांच्यात्यांच्या बायकांच्या नव्हे!)आया यांनी केलेल्या पदार्थांवर माझं विशेष लक्ष असते. नवीन पदार्थ आणि त्यांच्या recipesचा तो माझा एक authentic source आहे.  एकदा ​एका मित्राच्या आईने केलेली बिस्किटे मला आवडली. जरा माझ्यासाठी जास्त गोड होती पण ते मला आवडेल अश्या पद्धतीने कसं बदलायचं याचे आडाखे माझ्याकडे तयार होते. मित्राच्या आईकडून त्यांची कृती घेतली. या शिवाय 'आणखीन तुम्ही नक्की काय काळजी घेताहे विचारून घेतलं - हे फार महत्वाचं असतं.  या बारीक खुब्याजातिवन्त सुगरण बाई इतरांना सहज देत नाही. वेगवेगळ्या प्रकाराने विचारून ते गुपित प्रयासाने काढून घ्यावं लागतं. असे सर्व पापड लाटून शेवटी ती कृती हातात आली.

मग  सामानाची जमवाजमव केली. एक निवांत रविवारचा मुहूर्त शोधला. बायकोकडून स्वयंपाक घराचा ताबा घेतला. "तुझं स्वयंपाकघर स्वच्छ करून परत देईन" अशी शरणचिठ्ठी लिहून दिली. मैदाचाळलेली कणिक - कोमट दुधात भिजवलीत्या पातेल्याभोवती गरम पाण्यात बुडवलेलं फडकं गुंडाळून ठेवलं. फेटलेलं तूपएक चमचा unsalted butter - जशी कृती मला मिळालेली होती त्याप्रमाणे व्यवस्थित एका पाठोपाठ एक घटक मिक्स करत होतो. साखर चार चमचे होतीत्याऐवजी एकच घेतली - कारण मला  नानकटाई ऐवजी मारी बिस्किटे करायची होती. मीठ एका चिमटीच्या जागी दीड चिमूट घेतले. कारण तेच - ग्लुकोज नाहीमारी बिस्कीट ! वेलची टाकणं अपेक्षित होतंते कटाप केलं. मला वेलची आवडत नाही - त्याऐवजी दालचिनी पावडर टाकली. यीस्ट टाकताना जरा गोंधळलो. मित्राच्या आईने सांगितले होते "एक फुलपात्र मैदा असेल तर घोटभर पाण्याएवढ्या दुधात यीस्ट कालवायचं" - आता मित्राकडचं फुलपात्र आमच्या  घरच्या फुलपात्रापेक्षा जरा लहानच. त्यातून बिस्कीट जाळीदार करायची माझी महत्वाकांक्षा. माझ्याहातून यीस्ट जरा कणभर जास्तच पडलं असावं. ते तेव्हा लक्षात आले नाही हे मात्र खरं. मग ते मिश्रण १५ मिनिटं झाकून ठेवायचं होतं. थोडा वेळ मिळाला म्हणून पेपर घेऊन बसलो. तेवढ्यात एका मित्राचा फोन आला. मित्र बालपणाचा - त्यामुळे एकमेकांची टवाळकी करण्यात वेळ छान गेला. गप्पा रंगतच होत्या तेव्हा बायकोने हातातून फोन जवळजवळ काढूनच घेत आठवण करून दिली - "तुझ्या त्या बिस्किटांचे कुठवर आले आहे ते बघ जरा ..". फोन मग तिच्या हातात दिला - मित्र तिलाही चांगलाच ओळखणारा - तेव्हा त्यांनी तो फालतूपणा पुढे चालू ठेवला.

बिस्किटाचे पीठ छानच वर आले होते ! बायको चांगल्या मुडात असावी.  तिने ओव्हन चालू करून ठेवला होता (जे मी विसरलो होतो !) - बिस्किटांच्या मोल्डमध्ये मिश्रण टाकले आणि आता वाट बघत बसलो. "ओव्हन मध्ये मिश्रण टाकलं ना कि एक चहा प्यायचा - म्हणजे तोपर्यंत बिस्किटं तयार होतात" - असा मित्राच्या आईचा सल्ला होता. त्याप्रमाणे बायकोला ऑर्डर सोडली - चहा कर. तिनेही ती तितकयाच जोरात धुडकारली –
'हुडुत - मी नाही तिथे पाय ठेवणार .. चहा तूच कर. आणि मलाही दे. आणि जरा बरा कर. नेहेमीप्रमाणे फुळुक पाणी नको". शरण चिठ्ठी लिहून दिलेलीच होती. त्याप्रमाणे चहा केला - एकमेकांना टोमणे मारत मजेत प्यायलो. तोपर्यंत ओव्हन मधून छान वास यायला सुरवात झाली होती. आणि ओव्हन मध्ये बघतो तर बिस्किटांच्या ऐवजी मस्त फुललेले कप केक सारखे दिसणारे बनपाव तयार झाले होते!

माझ्या प्रयोगामुळेज्यात साखर कमीयीस्ट जास्त असल्या बदलांमुळे कुरकुरीत बिस्किटांऐवजी सुरेख cinnamon पाव तयार झाले होते! त्यांची चव छानच होती! मग आणखीन एक चहा आवश्यकच होता. तो मात्र बायकोने केला. तिच्या कॉमेंट्स चालूच. वर मित्रांना सांगायला एक किस्सा मिळाल्याचे समाधान! मजाच मजा. मी मात्र बिस्किटं न जमल्याचं दु:ख मानू का सुरेख बनपाव केल्याचा आनंदह्या दुग्ध्यात !


जितकं लक्ष द्याल तितका स्वयंपाक छान असं मी म्हटलं ते यासाठी. बरेच प्रयत्न करून परत तसे बनपाव जमले नाहीत - कॅरमचे strikers, कोळशाच्या गोल लाद्या,   बऱ्याच  वेळेला मारी बिस्कीटंही  - वगैरे प्रकार मात्र बरेच झाले. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या बैठकीत सांगायला एक किस्सा झाला. बनपाव काय सुरेख झाले होते म्हणून सांगू - परत जमले नाही म्हणून काय झालंत्यांची चव अजूनही कमी होत नाही. जमतही नाही आणि विसरताही येत नाही अशी माझी हि एक पाककृती !

- अभिजित टोणगावकर 


No comments:

Post a Comment